लवकरच येतेय TATAची ब्रँडेड फीचर कार, किती असेल किंमत?

Last Updated:

Tata Sumo 2025 : टाटा सुमो 2025 मध्ये नव्या लूकसह आणि आधुनिक फीचर्ससह पुन्हा भारतीय बाजारात येणार आहे. पाहूयात या गाडीची किंमत आणि फिचर्सचे सगळे डिटेल्स.

News18
News18
मुंबई : 90 च्या दशकात भारतीय रस्त्यांवर धडाक्यात धावणारी टाटा सुमो सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर असेल. आपल्यातील अनेक जण टाटा सुमोचे फॅन आहेत. याच फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 90च्या दशकातील ती टाटा सुमो पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार असल्याच्या चर्चा आहे. टाटा सुमो पुन्हा भारतीय बाजारात परतणार असल्याचं बोललं जात आहे. एकेकाळी भारतीयांच्या मनात घर करणारी ही SUV काही कारणांमुळे बंद झाली होती. मात्र अफवांनुसार Tata Sumo 2025 मध्ये नव्या लूकसह आणि ब्रँडेड फीचर्ससह पुन्हा लाँच होणार आहे.

टाटा सुमो 2025 चे संभाव्य फीचर्स

टाटा सुमोच्या नव्या मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले जातील अशी शक्यता आहे:
  • 10-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व वायरलेस चार्जिंग
  • क्रूझ कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल
  • ड्रायव्हर व पॅसेंजरसाठी एअरबॅग्ज
  • अ‍ॅडजस्टेबल सीट्स, LED टेललाइट्स
  • म्युझिक सिस्टम, यूएसबी पोर्ट
  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
  • डिजिटल क्लॉक, स्पीडोमीटर, ट्रिप मीटर
  • आरामदायक इंटीरियर व स्टायलिश डिझाइन
advertisement

इंजिन आणि कामगिरी

टाटा सुमो 2025 मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स उपलब्ध असतील अशी चर्चा आहे.
  • 1999cc पेट्रोल इंजिन
  • 2956cc डिझेल इंजिन
हे इंजिन्स 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह असतील. या SUV चे मायलेज अंदाजे 16 किमी/लिटर इतके असू शकते.
advertisement

टाटा सुमो 2025: किंमत आणि लाँच डेट

सूत्रांनुसार, या कारची किंमत (एक्स-शोरूम) अंदाजे 5.99 लाखांपासून सुरू होईल. लाँचची अपेक्षित तारीख 2025 च्या शेवटच्या तिमाहीत असू शकते. मात्र, कंपनीने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
मराठी बातम्या/ऑटो/
लवकरच येतेय TATAची ब्रँडेड फीचर कार, किती असेल किंमत?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement