Toyota ची पहिली इलेक्ट्रिक SUV अखेर लाँच, तब्बल 543 किमी रेंज, फिचर्सही दमदार

Last Updated:

अखेरीस बाजारात ग्राहकांची मागणी पाहत टोयोटाने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV आणली आहे.Toyota Ebella Urban Cruiser EV असं या SUV चं नाव आहे

+
इलेक्ट्रिक

इलेक्ट्रिक SUV बाजारात टोयोटाची जोरदार एंट्री; अर्बन क्रूझर ईव्हीने टाटा-महिंद्रा-सुझुकीला थेट आव्हान

मुंबई: भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात आज मोठा बदल घडताना दिसत असून टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही लाँच केली आहे.  टोयोटाने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांबाबत सावध भूमिका घेऊन हायब्रिड आणि हायड्रोजन तंत्रज्ञानावर भर देत होती. पण, अखेरीस बाजारात ग्राहकांची मागणी पाहत टोयोटाने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV आणली आहे.  Ebella   Urban Cruiser EV असं या SUV चं नाव आहे. या Ebella मुळे आता टोयोटा आता  टाटा, महिंद्रा आणि सुझुकी यांच्यासोबतची स्पर्धा करणार आहे.
Toyota Urban Cruiser Ebella EV ही खरीखुरी SUV ओळख जपणारी कार असून तिच्या डिझाइनमध्ये Sophisticated स्टाइल, Bold Appearance आणि Refined Styling यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. अर्बन टेक थीमवर आधारित फॅशिया, टोयोटाच्या सिग्नेचर हेडलॅम्प्स आणि DRL मुळे ही इलेक्ट्रिक SUV रस्त्यावर वेगळीच छाप पाडते. मारुती सुझुकीच्या e Vitara प्लॅटफॉर्मवर आधारित असली तरी टोयोटाची स्वतःची डिझाइन भाषा या कारला स्वतंत्र ओळख देते.
advertisement
बॅटरी किती? 
Toyota Urban Cruiser Ebella EV च्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर,  ही इलेक्ट्रिक SUV मध्ये Lithium Iron-Phosphate (LFP) बॅटरी तंत्रज्ञानासह ही कार 49 kWh आणि 61 kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध होणार असून 120 kW पॉवर आणि 189 Nm टॉर्क निर्माण करते. बॅटरी कूलिंग सिस्टममुळे उन्हाळ्यात जलद कूलिंग, स्थिर बॅटरी तापमान आणि सातत्यपूर्ण आउटपुट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, ही SUV एका पूर्ण चार्जवर 500 ते 550 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते, जी या सेगमेंटमध्ये महत्त्वाची मानली जात आहे.
advertisement
फिचर्स काय? 
Toyota Urban Cruiser Ebella EV ही लक्झरी, आराम आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही  मागे नाही. कारमध्ये Ventilated Seats, Panoramic Roof, 10.1-इंच इंटिग्रेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, डायल-टाइप शिफ्ट गिअर नॉब, 12-कलर व्हेरिएबल अॅम्बियंट लाइटिंग आणि प्रीमियम JBL साउंड सिस्टम देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये 7 SRS एअरबॅग्स, मजबूत हाय-टेनसाइल स्ट्रक्चर आणि संतुलित सस्पेन्शन देण्यात आले असून, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय iConnect मोबाईल अ‍ॅपद्वारे 100 हून अधिक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स, चार्जिंग स्थिती आणि रिअल-टाइम अलर्ट्स उपलब्ध असतील.
advertisement
किंमत किती? 
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीची अंदाजित एक्स-शोरूम किंमत 20 ते 25 लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. पण, अद्याप अधिकृत किंमत जाहीर करण्यात आली नाही. मात्र, आजपासून Toyota Urban Cruiser Ebella EV  चं 25,000 रुपयांत बुकिंग सुरू करण्यात आलं आहे.
टाटा, महिंद्राला भिडणार
8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, Battery-as-a-Service पर्याय, 3 वर्षांनंतर 60 टक्क्यांपर्यंत Assured Buy Back, 500 पेक्षा जास्त BEV-सक्षम सर्व्हिस टचपॉइंट्स, 24x7 रोडसाइड असिस्टन्स तसंच Charge Zone आणि Jio-BP सोबतची देशव्यापी चार्जिंग भागीदारी पाहता, अखेर टोयोटाने भारतीय ईव्ही बाजारात जोरदार एंट्री करत टाटा, महिंद्रा आणि सुझुकीसमोर ठाम आव्हान उभं केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ची पहिली इलेक्ट्रिक SUV अखेर लाँच, तब्बल 543 किमी रेंज, फिचर्सही दमदार
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement