Gold Price बाबत असं कधीच झालं नाही, ओलांडली 'लक्ष्मणरेषा', पुढे काय होणार? अलर्ट वाचून पायाखालची जमीन सरकेल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Prices All Time High: जागतिक बाजारात वाढलेल्या भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोनं-चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. Comex वर गोल्ड 4700 डॉलर पार गेला असून चांदीनेही नवा विक्रम नोंदवत गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.
मुंबई: मंगळवार 20 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मौल्यवान धातूंकडे धाव घेतल्याने दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 17,000 रुपये प्रति किलोची वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे, सोन्याच्या किमतीत सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली असून, इतिहासामध्ये पहिल्यांदाच सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पार गेला आहे.
दोन दिवसांत चांदी 11 टक्क्यांनी महागली चांदीच्या किमतीतील तेजी थक्क करणारी आहे. सोमवारी चांदीने पहिल्यांदाच ३ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता आणि बाजार बंद होताना ती 3,10,275 रुपये प्रति किलोवर स्थिर झाली होती. विशेष म्हणजे, केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये चांदीची किंमत 32,187 रुपयांनी वाढली आहे, म्हणजेच केवळ दोन दिवसांत चांदी 11.18 टक्क्यांनी महागली आहे.
advertisement
जागतिक बाजारातही सोने-चांदी सर्वोच्च पातळीवर भारतीय बाजारपेठेप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर (All Time High) पोहोचले आहेत. 'कॉमेक्स' (Comex) वर गोल्ड फ्युचर्सने पहिल्यांदाच 4700 डॉलर प्रति औंसचा स्तर ओलांडला. फेब्रुवारी कॉन्ट्रॅक्ट 127.15 डॉलरच्या वाढीसह 4722.55 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तसेच कॉमेक्सवर मार्च डिलिव्हरीसाठीचे सिल्व्हर फ्युचर्स 94.74 डॉलर प्रति औंस या विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.
advertisement
भाव का वाढत आहेत? SmartWealth.ai चे संस्थापक पंकज सिंह यांनी या दरवाढीमागची कारणे स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली असून त्याचा थेट फायदा सोने-चांदीला मिळत आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच सोन्यामध्ये चढ-उतारांसह मजबुती पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक आर्थिक वृद्धी असमान असून विविध धोरणांबाबत स्पष्टतेचा अभाव आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
advertisement
जागतिक तणावाचा परिणाम पंकज सिंह यांच्या माहितीनुसार, इराणच्या आसपास वाढणारा तणाव, व्हेनेझुएलावर अमेरिकेचा नवा लष्करी दबाव आणि ग्रीनलँड संदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टिप्पणीनंतर 'नाटो' (NATO) देशांशी संबंधित निर्माण झालेली अनिश्चितता, यांमुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे. आता सर्वांचे लक्ष 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होणाऱ्या भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे (Union Budget 2026) लागले आहे. विशेषतः सोन्यावरील आयात शुल्काबाबत (Import Duty) काय संकेत मिळतात, यावर पुढील वाटचाल अवलंबून असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 10:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price बाबत असं कधीच झालं नाही, ओलांडली 'लक्ष्मणरेषा', पुढे काय होणार? अलर्ट वाचून पायाखालची जमीन सरकेल








