Toyota ने टाकला मोठा डाव, आणली पाठी मागून मर्सिडिजसारखी दिसणारी SUV

Last Updated:

जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक स्टायलिश आणि दमदार अशा कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी जपानी कार उत्पादक कंपनी टोयोटाने एक बेस्ट पर्याय दिला आहे.

News18
News18
जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक स्टायलिश आणि दमदार अशा कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी जपानी कार उत्पादक कंपनी टोयोटाने एक बेस्ट पर्याय दिला आहे. टोयोटा ही दमदार आणि दणकाट कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अलीकडे टोयोटाने आपली toyota urban cruiser ही नव्याने लाँच केली आहे. ही एक मिड एसयूव्ही आहे. दोन नवीन बदल करून टोयोटाने ही एसयूव्ही लाँच केली आहे. toyota urban cruiser मध्ये आता तुम्हाला ६ एअर बॅग्स मिळणार आहे.
टोयोटाने URBAN Cruiser Taisor च्या सगळ्याच व्हेरिएंटमध्ये E, S, S+, V आणि G मध्ये 6 एअरबॅग्स देणे अणिवार्य केलं आहे. या एसयूव्हीमध्ये फ्रंट, साइड आणि कर्टन एअरबॅग्स दिले आहे.  ज्यामुळे कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा अधिक चांगली होणार आहे. कंपनीने हे बदल भारत सरकारने केलेल्या सेफ्टी धोरणामुळे केली आहे.
advertisement
URBAN Cruiser Taisorचे फिचर्स
टोयोटा नेहमी आपल्या गाड्यांमध्ये दमदार असे फिचर्स देत असते. URBAN Cruiser Taisor मध्ये सुद्धा फिचर्सची कोणती कमी नाही. या एसयूव्हीमध्ये LED हेडलाईट, ट्विन LED DRLs, रिअर एसी वेंट्स, टुअल टोन इंटीरिअर, पार्किंग सेंसर्स, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे दमदार फिचर्स दिले आहे. या एसयूव्हीमध्ये हाइट एडजेस्टेबल ड्राइव्हर सीट दिले आहे.
advertisement
URBAN Cruiser Taisor मायलेज आणि किंमत
URBAN Cruiser Taisor मध्ये तुम्हाला 998 सीसी पेट्रोल इंजिन मिळेल, जे 98.69 bhp पॉवर आणि 147.6 Nm चा टॉर्क जनरेट करतो. या कारमध्ये 37 लिटर इंधन क्षमता असलेली टाकी आहे. Cruiser Taisor चं मायलेज बघितलं तर 20 kmpl शानदार मायलेज देते. टोयोटाच्या या एसयूव्हीमध्ये 308 लिटरचा मोठा बूट स्पेस दिला आहे. टोयोटा URBAN Cruiser Taisor ची किंमतही एक्स-शोरूम 7.88-13.19 लाख रुपयांपासून  आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ने टाकला मोठा डाव, आणली पाठी मागून मर्सिडिजसारखी दिसणारी SUV
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement