दहावी पास असाल तर सुवर्णसंधी! राज्यात होमगार्ड भरती; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Last Updated:

विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी करण्यात येत असून होमगार्ड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अर्ज भरण्यास 15 जुलैपासून झाली सुरूवात!
अर्ज भरण्यास 15 जुलैपासून झाली सुरूवात!
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : राज्यात येत्या काही दिवसांमध्ये 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. याच धर्तीवर विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
जालना जिल्ह्याच्या विविध पथकातील रिक्त 195 होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे होमगार्ड पदासाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींनी सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन जालना पोलीस दलाकडून करण्यात आलंय.
advertisement
नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचा अर्ज https://maharashtracdhg.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि वय 20 ते 50 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तर, पुरुषांची उंची 162 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 150 सेंटीमीटर असायला हवी.
advertisement
होमगार्ड पदासाठी 15 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून 17 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असं आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
दहावी पास असाल तर सुवर्णसंधी! राज्यात होमगार्ड भरती; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement