तरुणांसाठी सुवर्णसंधी! सैन्यात तब्बल 25 हजार पदांसाठी होतेय भरती, अर्जाची शेवटची तारीख काय?

Last Updated:

Job Alert: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. यातील अनेकांना सैन्यात दाखल होण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

आर्मी अग्निवीर भरती
आर्मी अग्निवीर भरती
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारती लष्करामध्ये भरती होणार आहे. अग्निवीर योजनेच्या माध्यमातून सैन्यात काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. यासाठी 13 फेब्रवारीपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. यात जवळपास 25 हजार पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 22 मार्च आहे. येथे ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. यानंतर कॉमन एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच सीईई घेतली जाणार आहे. ही परीक्षा 22 एप्रिल रोजी होईल. यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या प्रक्रियेचा सामना उमेदवारांना करावा लागेल. यानंतर अंतिम निवड केली जाईल. या 25 हजार जागांमध्ये लष्करामधील विविध पदांसाठी भरती होत आहे.
या वेबसाइटवर मिळेल माहिती
भारतीय लष्करामध्ये प्रवेश करण्यासाठी अग्निवीर योजना सुरु करण्यात आली आहे. 25 हजार पदांपैकी कोणत्या विभागात किती जागा आहे याविषयीची माहिती तुम्हाला https://www.joinindianarmy.nic.in/ या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्याआधी तुम्हाला लॉगीन करणं गरजेचं असणार आहे. यानंतर अर्ज भरता येऊ शकतो.
advertisement
या लोकांना मिळेल संधी
या पदांसाठी म्हणजेच भारतीय लष्करामध्ये जाण्यासाठी आठवी, दहावी पास असलेल्यासोबतच आयआयटी, डी.फार्मसीला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना देखील संधी दिली जाणार आहे. यासोबतच दहावीला किमान 45 टक्के गुण असणंही आवश्यक आहे. यासोबतच काही पदांसाठी विज्ञानातील गुणही तपासले जाणार आहेत.
advertisement
निवडीसाठी आहेत दोन टप्पे
या पदांच्या निवडीसाठी दोन टप्पे आहेत. यामध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा एक आहे. 22 एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. तर यानंतर दुसरी परीक्षा म्हणजेच प्रत्यक्ष भरती होईल. ऑनलाइन परीक्षेत पास झालेल्यानंतारच प्रत्यक्ष मैदानातील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. यामध्ये उंची, वजन आदींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल. प्रत्येक टप्प्यावर गुण देण्यात येतील. या सर्वांचे गुण एकत्र केले जातील आणि मगच गुणवत्ता यादी जारी करण्यात येईल.
advertisement
असा करावा अर्ज
भारतीय लष्करातील अग्निवीर योजनेच्या माध्यमातून प्रवेश करायचा असले तर आधी https://www.joinindianarmy.nic.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरा. येथेच अर्जासंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
तरुणांसाठी सुवर्णसंधी! सैन्यात तब्बल 25 हजार पदांसाठी होतेय भरती, अर्जाची शेवटची तारीख काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement