नोकरीसाठी परीक्षेचं नो टेन्शन, जिल्हा आरोग्य विभागात होतेय थेट भरती, लगेच करा अर्ज
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
कोणत्याही परीक्षेशिवाय भरती होत असल्यानं इच्छुकांनी भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावं.
मुंबई, 23 डिसेंबर: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता इच्छुकांना थेट नोकरी मिळवता येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावं. कारण उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीतूनच होणार आहे. परभणी जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना नोकरी मिळवण्याची नामी संधी असणार आहे.
काय आहे पात्रता?
या भरती प्रक्रियेसाठी एमबीबीएस, पी.जी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीतून होणार असून ती ऑफलाईन असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 58 असावे. या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे लागेल. उशीरा आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही.
advertisement
वैद्यकीय विषयांना संधी
मुलाखतीला येताना उमेदवारांना आपली महत्वाची कागदपत्रे आणावी लागणार आहेत. मुलाखतीला जाण्याच्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितपणे वाचावी. तुमचे जर शिक्षण वैद्यकीय विषयात झाले असेल तरच ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. नोकरीचे ठिकाण हे परभणी असणार आहे.
advertisement
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय विभागामध्ये मोठी मेगा भरती सुरू आहे. आता थेट परभणी येथे देखील ही भरती सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीतूनच उमेदवाराची निवड होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Dec 23, 2023 3:46 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
नोकरीसाठी परीक्षेचं नो टेन्शन, जिल्हा आरोग्य विभागात होतेय थेट भरती, लगेच करा अर्ज







