सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 10वी पाससाठी नोकरीची सुवर्ण संधी, अर्ज करण्याची तारीख आणि प्रक्रिया जाणून घ्या

Last Updated:

बँकेने ज्या रिक्त पदासाठी अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 23 डिसेंबर : तुम्ही दहावी पास असाल आणि बँकेत नोकरी करण्यासाठी संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी जागा रिक्त आहेत. नोकरी इच्छूकांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी कारण जानेवारीच्या सुरुवातीला ते बंद होणार आहे.
बँकेने ज्या रिक्त पदासाठी अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार Centralbankofindia.co.in या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे या भरतीसाठी उमेदवार 9 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी जास्त वेळ नाही, त्यामुळे उमेदवारांनी या पदांसाठी लवकर अर्ज करावा.
advertisement
रिक्त जागा तपशील
या विशेष भरतीअंतर्गत, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार म्हणून उप-कर्मचाऱ्यांच्या एकूण 484 रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील.
अर्जासाठी आवश्यक पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 10 वी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 31 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 26 वर्षे असावी. तथापि, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज फी
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 175 भरावे लागतील. इतर सर्व उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
advertisement
अशी असेल निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाईल. माहितीनुसार, या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 10वी पाससाठी नोकरीची सुवर्ण संधी, अर्ज करण्याची तारीख आणि प्रक्रिया जाणून घ्या
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement