CBSE: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी, आता वर्षातून 2 वेळा देता येणार परीक्षा

Last Updated:

२०२६ पासून वर्षांतून दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा देता येणार आहे.  पहिला टप्पा हा अनिवार्य असेल तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे. 

CBSE Pattern
CBSE Pattern
नवी दिल्ली: CBSE विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता आता वर्षातून दोनदा CBSE ची परीक्षा  देता येणार आहे.  २०२६ पासून वर्षांतून दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा देता येणार आहे.  पहिला टप्पा हा अनिवार्य असेल तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.  दोन्ही परीक्षेतील जे मार्क जास्त असतील ते अंतिम निकालात ग्राह्य धरले जाणार आहे.
CBSE बोर्डाची परीक्षा वर्षातून आता एप्रिल आणि जून महिन्यात जाहीर होईल. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी स्पष्ट केलं आहे की, पहिल्याा सत्राची परीक्षा ही फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात परिक्षा होणार आहे.
CBSE कडून माहिती देण्यात आली आहे की, दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील परिक्षेत सहभागी होणे हे अनिवार्य असणार आहे. तर दुसऱ्या सत्रातील परिक्षेमध्ये बसण्याचा निर्णय हा पर्यायी असणार आहे.
advertisement
NEP २०२० मध्ये दिली सूचना
सीबीएसईने दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या निकषांना मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये हे सुचवण्यात आले आहे.
हिवाळी सत्रातील विद्यार्थ्यांना ही मिळेल सूट 
सीबीएसईने मंजूर केलेल्या निकषांनुसार, हिवाळी सत्रात सहभागी होणाऱ्या शाळांमधील दहावीचे विद्यार्थी कोणत्याही टप्प्याच्या बोर्ड परीक्षेत बसू शकतील. माहितीनुसार, अंतर्गत मूल्यांकन शैक्षणिक सत्रादरम्यान फक्त एकदाच केले जाईल. सीबीएसईने फेब्रुवारीमध्ये मसुदा नियमांची घोषणा केली होती. नंतर ते संबंधितांच्या अभिप्रायासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्यात आले होते.
advertisement
तीन विषयांमध्ये सुधारणा करण्याची संधी  
विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा यासारख्या कोणत्याही तीन मुख्य विषयांमध्ये गुण सुधारण्याचा पर्याय मिळेल. याचा अर्थ असा की विद्यार्थी फक्त त्या विषयांमध्येच पुन्हा परीक्षेला बसतील ज्यामध्ये ते त्यांच्या पहिल्या प्रयत्नाने समाधानी नाहीत.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
CBSE: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी, आता वर्षातून 2 वेळा देता येणार परीक्षा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement