Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी! एकूण 600 जागांवर भरती; महिन्याला मिळणार 1,60,000 रूपये पगार, अर्ज कसा कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे मंत्रालयाच्या कंपनीत नवीन भरतीची घोषणा केली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा एक उपक्रम, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) एमटीएस, ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीची घोषणा झाल्यानंतर अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे मंत्रालयाच्या कंपनीत नवीन भरतीची घोषणा केली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा एक उपक्रम, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) एमटीएस, ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीची घोषणा झाल्यानंतर अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. dfccil.com या अधिकृत वेबसाइटवर 18 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. ज्यामध्ये उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतील.
आवश्यक पात्रता काय आहे?
डीएफसीसीआयएल ज्युनियर मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सीए/सीएमए अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तर सिव्हिल एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनिअरिंग/सिव्हिल इंजिनिअर ट्रान्सपोर्टेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/सिव्हिल इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ इत्यादी विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. तर इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्हसाठी, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सप्लाय/इंस्ट्रुमेंटल आणि कंट्रोल/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्ह सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा देखील आवश्यक असेल. त्याच वेळी, किमान ६०% गुणांसह एक वर्षाची अप्रेंटिसशिप/आयटीआयसह दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार एमटीएस पदांसाठी अर्ज करू शकतात
advertisement
वयोमर्यादा काय आहे?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. एमटीएससाठी कमाल वय 33 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयोमर्यादा 1 जुलै 2025 च्या आधारावर निश्चित केली जाईल. तर राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाते.
निवड प्रक्रिया: या पदांसाठी उमेदवारांची निवड सीबीटी १, सीबीटी २, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. एमटीएससाठी पीईटी देखील असेल.
advertisement
पगार किती असणार?
ज्युनियर मॅनेजरला 50,000 ते 1,60,000 रुपये, एक्झिक्युटिव्ह पोस्टला 30,000 ते 1,20,000 रुपये आणि एमटीएसला 16,000 ते 45,000 रुपये दरमहा पगार मिळेल.
अर्ज शुल्क किती?
कनिष्ठ व्यवस्थापक/कार्यकारी पदांसाठी, उमेदवारांना अर्ज करताना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एमटीएससाठी परीक्षा शुल्क 500 रुपये आहे.
सीबीटी 1 ची परीक्षा स्क्रीनिंग स्वरूपाची असेल. ज्यामध्ये उमेदवारांची निवड CBT 2 साठी केली जाईल. दोन्ही टप्प्यातील परीक्षांमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी! एकूण 600 जागांवर भरती; महिन्याला मिळणार 1,60,000 रूपये पगार, अर्ज कसा कराल?


