आता शिकण्यासाठी मिळणार पैसे, PM इंटर्नशिपची मोठी संधी, लगेच करा अर्ज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
PM Internship Scheme: कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी अनुभव गरजेचा असतो. जालन्यात 5 कंपन्यात जागा असून इंटर्नशिपसाठी अनुदान मिळणार आहे.
जालना: कोणत्याही क्षेत्रामध्ये पाय रोण्यासाठी आधी त्या क्षेत्राचे योग्य प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं असतं. इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच पदवीधर व आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. जालना जिल्ह्यातील तब्बल पाच नामांकित कंपन्यांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज मागवले आहेत. या इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये भत्ता देखील देण्यात येणार असून मुलाखत पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरीत अर्ज करावे, असं आवाहन करण्यात आलंय.
पात्रता काय?
जालना जिल्ह्यातील 9 आस्थापनांनी http://pminternship. mca.gov.in/या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. वय 21 ते 24 वर्षे असलेल्या तरुणांना ही खास संधी आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ दहावी, बारावी, पदवीधर आणि आयटीआय शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले.
advertisement
असा करा अर्ज
इंडियन ऑइल कॉ. लि., ज्युब्लीयंट फूडवर्क्स लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., बायर क्रॉपसायन्स प्रा. लि., पी.एन.सी. इफ्राटेक प्रा. लि., एच.डी.एफ.सी. बँक लि., श्रीराम फायनान्स लि., मेघा इंजिनिअरिंग अँड इफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या नामांकित कंपन्यांनी http://pminternship. mca.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षे असावे. दहावी, बारावी, पदवीधर आणि आयटीआय शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship. mca.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाइल तयार करावी आणि विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा.
advertisement
असा मिळणार लाभ
या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिपचा लाभ घेता येईल. त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये अनुदान मिळेल. भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतंर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
March 18, 2025 2:53 PM IST