शेतकऱ्याच्या पोराला मिळालं साडेबारा लाखाचं पॅकेज, गावातला तरुण बनला दुबईत इंजीनिअर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबात 4 मोठ्या बहिणी आहेत आणि त्याचे वडील शेती करतात. मात्र, वडिलांचे स्वप्न होते की, मुलाने परदेशात जाऊन नोकरी करावी.
धीर राजपूत, प्रतिनिधी
फिरोझाबाद : आयुष्यात जर यश मिळवण्यासाठी जिद्द, समर्पण आणि मेहनतीची तयारी असेल तर व्यक्ती एक दिवस नक्की यशस्वी होतो. एका शेतकऱ्याच्या मुलाने हे सिद्ध करुन दाखवले आहे. शेतकऱ्याच्या या मुलाने गावात राहूनच आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर तो परदेशात मेकॅनिकल इंजीनिअर बनला आहे. इतकेच नव्हे तर त्याला दुबईतील एका कंपनीत 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैशांचे पॅकेज मिळाले आहे.
advertisement
अंकुल यादवची प्रेरणादायी गोष्ट -
फिरोजाबादच्या लाटई या लहान गावात राहणाऱ्या अंकुल यादवची ही कहाणी आहे. लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबात 4 मोठ्या बहिणी आहेत आणि त्याचे वडील शेती करतात. मात्र, वडिलांचे स्वप्न होते की, मुलाने परदेशात जाऊन नोकरी करावी. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने बारावीला दुहिली येथे 2017 मध्ये प्रवेश घेतला.
advertisement
त्याठिकाणी त्याला चांगले गुण मिळाले आणि मग त्याने इंडियन एअरफोर्स, एनडीए, डिफेन्ससाठी 10 महिने तयारी केली. मात्र, तो फिजिकली फिट नसल्याने त्याला यश मिळाले नाही. मग त्याने इंजीनिअरींगसाठी शिकोहाबादच्या जे. एस. विद्यापीठात बीटेकला प्रवेश घेतला आणि त्याठिकाणी त्याने दिवस रात्र मेहनत करुन यश मिळवले.
advertisement
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा पुढाकार, विठुरायाच्या वारीत राबवला जातोय पर्यावरणपूरक उपक्रम, काय आहे हा उपक्रम
पुढे तो म्हणाला की, त्याला दुबईच्या बरारी ग्रुपमध्ये मेकॅनिकल इंजीनिअरची नोकरी मिळाली आहे. साडेबारा लाख रुपये पॅकेज मला मिळाले. 10 महिन्यांपूर्वीच मी दुबईत टाऊन ट्रेनिंग सुरू केली आहे. तसेच लवकरच मी नोकरीवर रुजू होणार असल्याचे त्याने सांगितले.
advertisement
24 वर्षांच्या तरुणाचा अभिमान -
view commentsफिरोजाबादच्या शिकोहाबादमधील जे. एस. विद्यापीठातील कुलगुरू यांनी अंकुलच्या संघर्षाबाबत सांगितले की, जेव्हा अंकुल आमच्याकडे आला तेव्हा त्याचे स्वप्न मोठी होती. त्यासाठी त्याला इथे प्रवेश मिळवून दिला. आमच्या येथील शिक्षकही त्याचे खूप कौतुक करायचे. खूप लहानशा खेड्यातील या मुलाने आज जे मिळवलं आहे, ते खूप कठीण आहे. आमच्यावतीने त्याला शक्य ती सर्व मदत करण्यात आली. आता त्याच्या आई वडिलांना आणि शिक्षकांना खूप अभिमान आणि आनंदाची अनुभूती होत आहे. 24 वर्षांच्या या तरुणाचे यशाने सर्वांना प्रेरणा मिळणार आहे.
Location :
Firozabad,Uttar Pradesh
First Published :
July 02, 2024 12:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
शेतकऱ्याच्या पोराला मिळालं साडेबारा लाखाचं पॅकेज, गावातला तरुण बनला दुबईत इंजीनिअर


