MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, वयोमर्यादा वाढवली
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
MPSC age limit: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. Mpsc च्या सर्व परीक्षांसाठी वयोमर्यादा 1 वर्षांनी वाढवण्यात आलीये.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे: राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्यात आलीये. नुकताच राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता (मराठा समाज) 26 फेब्रुवारी 2024 पासून 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने या जाहिरातीमध्ये बदल करून 'एमपीएससी'च्या 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 1 वर्षांनी शिथिल करण्यात आलीये. त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
advertisement
जागा वाढवण्याची मागणी
कोरोना काळात अनेक शासकीय भरत्या प्रलंबित होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्त्यांचं नुकसान झालं. वयोमर्यादा ओलांडलेल्यांना एक वाढीव संधी मिळणे गरजेचे होते. अनेक विद्यार्थ्यांनी राज्य शासनाकडे वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती. यालाच अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच शासकीय नोकर भरतीच्या पदांसाठी वयोमर्यादेत वाढ केलीये. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा शेवटची असणार आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी ठरू शकते. त्यामुळे राज्यसेवा आणि कंबाईनच्या जागा वाढवाव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे नितीन आंधळे आणि इतर विद्यार्थ्यांनी केलीये.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 26, 2024 10:22 AM IST