परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज; स्टडी स्मार्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा आधार

Last Updated:

वर्षभरात चार ते पाच ग्लोबल एज्युकेशन फेअर' घेत  परदेशात शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीची माहिती देखील जाते.

+
शिक्षण 

शिक्षण 

प्राची केदारी-प्रतिनिधी, पुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते, परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने हे स्वप्न अधुरे राहते. परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया काय आहे? तिथे राहण्याची सोय कशी होणार? खर्चासाठी निधी कसा उभा करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत स्टडी स्मार्टचे संचालक आणि परदेशी शिक्षण सल्लागार चेतन जैन यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे.
चेतन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्टडी स्मार्टने गेल्या 14-15 वर्षांमध्ये सुमारे 6,000 विद्यार्थ्यांना यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि दुबईसारख्या देशांमध्ये शिक्षणासाठी पाठवले आहे. प्रारंभी दोन लोकांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता 70 सदस्यांची टीम कार्यरत आहे.
स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रोफाइल, करिअर उद्दिष्टे, आणि आर्थिक स्थिती समजून घेत, त्यांना योग्य देश, विद्यापीठ, आणि अभ्यासक्रम निवडण्यात मदत करते. विशेष म्हणजे, या सल्लागार सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, व्हिसा प्रक्रियेमध्ये मदत, शिष्यवृत्ती मिळवून देणे आणि आवश्यकतेनुसार कर्जाची सोय करणे या सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात.
advertisement
चेतन जैन सांगतात की, "विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता थेट युनिव्हर्सिटीला फी जमा केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये याची काळजी घेतली जाते." याशिवाय, स्टडी स्मार्टने वर्षभरात चार ते पाच ग्लोबल एज्युकेशन फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीबद्दल मार्गदर्शनही दिले आहे.
मराठी बातम्या/करिअर/
परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज; स्टडी स्मार्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा आधार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement