12th Board Exam 2025 : 12 वीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय का? चिंता नको! 6 टिप्स ठरतील फायदेशीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : सध्या 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या काळात अनेक विद्यार्थी तणावाखाली असतात. हा तणाव स्वाभाविक असला तरी तो जास्त वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. परीक्षेची तयारी अधिक प्रभावी आणि तणावमुक्त करण्यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.
मुंबई : सध्या 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या काळात अनेक विद्यार्थी तणावाखाली असतात. हा तणाव स्वाभाविक असला तरी तो जास्त वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. परीक्षेची तयारी अधिक प्रभावी आणि तणावमुक्त करण्यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.
1) शांत आणि व्यवस्थित अभ्यासाची जागा निवडा
अभ्यासासाठी अशी जागा निवडावी जिथे भरपूर प्रकाश, शुद्ध हवा आणि शांतता असेल. अशा वातावरणात एकाग्रता वाढते. तसेच, अभ्यासादरम्यान मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.
2) वेळोवेळी ब्रेक घेणे
सतत अभ्यास केल्याने मेंदू थकतो, त्यामुळे नियमित ब्रेक घेणे आवश्यक आहे. थोडावेळ डोळे बंद करून विश्रांती घ्या, हलकीशी झोप घ्या किंवा थोडेसे चालणे फायदेशीर ठरते. यामुळे मन प्रसन्न राहते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे होते.
advertisement
3) निरोगी आहार घ्या
परीक्षा काळात पचनास त्रासदायक असलेले, जड अन्न टाळावे. गॅस, अॅसिडिटी, थकवा यामुळे अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो. भरपूर पाणी प्या आणि पोषणयुक्त आहार घ्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
4) पुरेशी झोप घेणे
आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. झोपेतून मेंदूला विश्रांती मिळते, जी स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते. काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास चांगला करता येतो, तर काहींसाठी सकाळची वेळ अधिक फायदेशीर असते. स्वतःसाठी योग्य वेळ शोधा.
advertisement
5) उपयोगी नोट्स तयार करा
महत्त्वाच्या विषयांसाठी छोटे-छोटे नोट्स तयार करा. शेवटच्या क्षणी जलद रीव्हिजन करता येते. कोणताही भाग राहिला असल्यास तो नोट्सच्या आधारे कव्हर करता येईल.
6) वेळापत्रक तयार करा
view commentsअभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सतत अभ्यास केल्याने तणाव वाढू शकतो, म्हणून विषयांमध्ये अंतर ठेऊन अभ्यास करा. प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ राखा, जेणेकरून अभ्यासात संतुलन राहील आणि तणाव कमी होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
12th Board Exam 2025 : 12 वीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय का? चिंता नको! 6 टिप्स ठरतील फायदेशीर


