Indian Army Recruitment 2025 : तरुणांना भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी! महिन्याला मिळणार महिन्याला मिळणार 1 लाखापर्यंत पगार, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
: भारतीय सैन्याने NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, वयोमर्यादा आणि रिक्त पदांविषयी संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : भारतीय सैन्याने NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, वयोमर्यादा आणि रिक्त पदांविषयी संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे. ही भरती NCC स्पेशल एंट्री स्कीम (ऑक्टोबर 2025 – 58वा कोर्स) अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी आहे. खालील तक्त्यात रिक्त पदांची माहिती दिली आहे.
एकूण जागा
NCC स्पेशल एंट्री (पुरुष) - 70
NCC स्पेशल एंट्री (महिला) - 06
शैक्षणिक पात्रता आणि अन्य अटी
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी.
अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल, परंतु त्यांच्या मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 50% गुण अनिवार्य आहेत.
उमेदवाराने किमान दोन वर्षे NCC मध्ये सेवा दिली असावी आणि त्याच्याकडे वैध NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
advertisement
वयोमर्यादा
1 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया आणि फी
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
नोकरीचे ठिकाण
उमेदवारांची भारतभर विविध सैन्य ठिकाणी नियुक्ती केली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
15 मार्च 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया
joinindianarmy.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या
advertisement
"Officer Entry Application/Login" विभाग निवडा आणि नवीन नोंदणी करा.
"Online Application" वर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 17, 2025 11:17 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Indian Army Recruitment 2025 : तरुणांना भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी! महिन्याला मिळणार महिन्याला मिळणार 1 लाखापर्यंत पगार, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या


