10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात भरती, कसा कराल कराल अर्ज?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागमध्ये शिकाऊ उमेदवार या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
नाशिक : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागमध्ये शिकाऊ उमेदवार या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 446 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
ही पदे भरली जाणार?
एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
पात्रता काय?
याभरतीसाठी उमेदवार 10 वी/ आयटीआय पास, पदवीधर असावा. पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे.
एसटी महामंडळातील या नोकरीसाठी 14 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे.
advertisement
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 12, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात भरती, कसा कराल कराल अर्ज?









