हातामध्ये पाना अन् हातोडा घेऊन ती करतीय मेकॅनिकगिरी, पाहा फरहिद शेख यांची प्रेरणादायी कहाणी
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आयटीआयपर्यंत शिक्षण घेतलेल्या फरहिद सिकंदर शेख ही महिला सोलापुरातील बस डेपो येथे मेकॅनिक म्हणून काम करत आहे. हातात पाना, हातोडा घेऊन हम भी किसीसे कम नही हे सांगत आज महिला देखील एसटी आगारात मेकॅनिकगिरी करत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : पूर्वीच्या काळी महिला फक्त गृहिणी असायच्या. पण आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयटीआयपर्यंत शिक्षण घेतलेल्या फरहिद सिकंदर शेख ही महिला सोलापुरातील बस डेपो येथे मेकॅनिक म्हणून काम करत आहे. हातात पाना, हातोडा घेऊन हम भी किसीसे कम नही हे सांगत आज महिला देखील एसटी आगारात मेकॅनिकगिरी करत आहे.
advertisement
फरहिद सिकंदर शेख यांचे शिक्षण आयटीआय पर्यंत झाले आहे. जेवढे काम एखादा पुरुष कर्मचारी करतो तेवढेच काम फरहिद सिकंदर शेख करत आहेत. एसटीमध्ये तीन महिन्याला प्रत्येक एसटीची पूर्ण देखभाल केली जाते. याला डॉकिंग म्हटले जाते. स्प्रिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे, इंजिनमधील काही तांत्रिक बिघाड असेल तर दुरुस्त करण्याचे काम सोलापुरातील एसटी आगारात फरहिद शेख करत आहेत.
advertisement
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला देखील लालपरीची दुरुस्ती सहजपणे करताना दिसून येत आहे. लालापरीचे टायर बदलण्यापासून ते इंजिनमधील बिघाड शोधून दुरुस्त करण्याचे आदी कामही मी करते. यामध्ये सर्व सहकारी मला चांगल्या प्रकारे मदत करत असतात. हे सर्व करत असताना घरची जबाबदारीही मी निभावते. यामुळे कुटुंबीयांची साथही मला मिळते, असं फरहिद शेख सांगतात.
advertisement
महिलांना जर कुटुंबांची आणि घरची जर साथ मिळाली तर कोणत्याही क्षेत्रात महिला काम करू शकतात. कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे त्या कामाचे ज्ञान घेऊन ते कार्य केल्यास नक्कीच यशस्वी होईल, असा सल्ला महिला मेकॅनिक फरहिद शेख यांनी दिला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 12, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
हातामध्ये पाना अन् हातोडा घेऊन ती करतीय मेकॅनिकगिरी, पाहा फरहिद शेख यांची प्रेरणादायी कहाणी







