Job Opportunity: महिन्याला मिळणार 1,57,000 रुपये, पाहा कुठे आहे ही नोकरीची संधी?
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला 1,57,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
नवी दिल्ली: आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला 1,57,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार यांपैकी काही पदांसाठी अर्ज करू शकतात. याचे सर्व तपशील आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या वेबसाइटवर दिलेले आहेत. या पदांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. अर्ज फक्त ऑनलाइन करता येतील. अॅप्लिकेशन फॉर्मची फायनल प्रिंट आउट 30 सप्टेंबरपर्यंत घेता येईल.
रिक्त पदं कोणती आहेत?
आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. आयडीबीआयने असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीच्या 25 आणि मॅनेजर ग्रेड बीच्या 31 पदांसाठी भरती काढली आहे. एकूण 56 जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी एकूण 23 पदं जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहेत, तर 14 जागा ओबीसी, नऊ जागा एससी आणि पाच जागा एसटी, तसंच पाच जागा ईडब्ल्यूएससाठी (आर्थिक मागास) राखीव आहेत.
advertisement
कोण करू शकतं अर्ज?
कॉर्पोरेट क्रेडिट रिटेल बँकिंगच्या असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीसाठी कोणताही पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतो. तसंच एमबीए डिग्री असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी किमान सात वर्षांचा अनुभव हवा. वय किमान 28 ते कमाल 40 वर्षांपर्यंत असावं. मॅनेजर बी ग्रेड पदांसाठी वयोमर्यादा 25 ते 35 वर्षं आहे. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त डिग्री घेतलेली असावी. तसंच उमेदवाराला कामाचा चार वर्षांचाअनुभव असावा. वय 1 ऑगस्ट 2024 या दिवशी किती आहे, ते मोजलं जाईल. आरक्षणाच्या नियमांनुसार उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
advertisement
कशी होईल निवड?
आयडीबीआय बँकेतल्या या भरतीसाठी मुलाखत आणि ग्रुप डिस्कशननंतर उमेदवारांची निवड केली जाईल. तसंच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणीही होईल. या पदांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
किती मिळेल वेतन?
आयडीबीआय बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 1,05,280 रुपये मासिक वेतन मिळेल. त्यांची निवड कोणत्याही मेट्रो शहरांसाठी झाली तर वेतन 1,57,000 रुपये असेल. मॅनेजर ग्रेड बीच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला 93,960 रुपये पगार मिळेल. मेट्रो शहरांसाठी हा पगार 1,19,000 रुपये असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2024 11:01 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Job Opportunity: महिन्याला मिळणार 1,57,000 रुपये, पाहा कुठे आहे ही नोकरीची संधी?