राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा असा घ्या लाभ, 12 जुलै रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
राजर्षी शाहू परदेशी शिष्यवृत्ती ही योजना सध्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी उपयुक्त ठरत आहे. यंदा 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अगदी काहीच दिवसांचा कालावधी राहिलेला आहे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : परदेशात शिक्षणासाठी जायचे असेल तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना एकतर एखादी स्कॉलरशिप मिळवावी लागते किंवा एखाद्याही योजनेच्या माध्यमातून ते शक्य करता येऊ शकते. अशीच राजर्षी शाहू परदेशी शिष्यवृत्ती ही योजना सध्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी उपयुक्त ठरत आहे. तर यंदा 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अगदी काहीच दिवसांचा कालावधी राहिलेला आहे.
advertisement
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घ्यायची संधी मिळावी, यासाठी शासनाकडून बरेच प्रयत्न केले जातात. त्यातच सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागामार्फत तर्फे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. 2003 पासून सुरू असणाऱ्या या योजनेद्वारे पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा ), त्याचबरोबर PhD चे शिक्षण घेण्याकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील 75 विद्यार्थ्यांना ही परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची संधी मिळत असते.
advertisement
यंदाची शेवटची तारीख 12 जुलै
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर होत असते. याची निवड गुणवत्तेनुसार केली जात देऊन 30 टक्के जागावर मुलींसाठी असतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत असून 12 जुलै 2024 ही 2024-25 वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
advertisement
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या आहेत अटी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनूसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा आहे. तसेच भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी आणि एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. इच्छुक विद्यार्थ्यांना परदेशातील जागतिक रँकिंगमधील 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा. तर विद्यार्थ्यांने विहीत कालावधीत अभ्यासक्रम पुर्ण करणेही बंधनकारक असतो.
advertisement
कसा घ्यावा या योजनेचा लाभ?
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करता येतो. पुढे अर्ज भरुन तो आवश्यक कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्त्यावर पाठवावा लागतो. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 75 विद्यार्थी योजनेसाठी निवडले जातात. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमानप्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च आदी लाभ मिळतात.
advertisement
दरम्यान या शिष्यवृत्ती बाबतच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकते. तसेच लवकरात लवकर यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
June 20, 2024 1:54 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा असा घ्या लाभ, 12 जुलै रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत


