मेकअप आर्टिस्ट होणं सोपं नाही! या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Makeup Artist Career : आजकाल घरोघरी विविध कार्यक्रम होतात. त्यानिमित्तानं महिलांसह पुरुषांकडूनसुद्धा मेकअपची मागणी असते. त्यामुळे ब्युटी पार्लर व्यवसायातून खूप नफा मिळू शकतो, पण...
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : 'मेकअप' हा विषय अनेकजण हसण्यावारी घेतात. परंतु सुंदर मेकअप असेल, तर चेहरा आकर्षक दिसतो यात काहीच शंका नाही. मात्र त्यासाठी मेकअप करण्याचं कौशल्य उत्तम हवं. जर हातात हे कौशल्य असेल तर ब्युटी पार्लर व्यवसायातून खूप नफा मिळू शकतो. कारण आजकाल घरोघरी विविध कार्यक्रम होतात. त्यानिमित्तानं महिलांसह पुरुषांकडूनसुद्धा मेकअपची मागणी असते.
advertisement
आपणही करियर म्हणून मेकअप क्षेत्राचा विचार करत असाल, तर काही गोष्टी आपल्याला ठावूक असणं आवश्यक आहे. पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रियांका मोरे यांनी याबाबत मार्गदर्शन केलंय. त्या म्हणाल्या, पूर्वी मेकअप हा विषय फार महत्त्वपूर्ण मानला जात नव्हता. मात्र आता या क्षेत्रात करियर करण्यासाठी विविध भागांमधून कलाकार मुंबई, पुण्यात प्रशिक्षण घ्यायला येतात. अनेक खासगी अकॅडमींकडून मेकअपचं प्रशिक्षण दिलं जातं. परंतु कोणतीही अकॅडमी जॉइन करण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी तपासणं आवश्यक आहे. तिथं नेमकं कसं शिकवतात, याची पूर्ण माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा.
advertisement
मेकअप आर्टिस्टचं काम फक्त मेकअप करणं एवढंच नाही, तर त्यांना ब्युटी इंडस्ट्रीमधील वेगवेगळ्या मेकअप प्रॉडक्ट्सबद्दल माहिती असायला हवी. त्यासाठी या प्रॉडक्ट्सचा अभ्यास करायला हवा. कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट्स उत्तम आहेत, ते नेमके कसे आहेत, याबद्दल माहिती मिळवायला हवी. ज्या अकॅडमीत कमी विद्यार्थी असतील, तिथंच प्रवेश घ्यावा. त्यामुळे मेकअप बारकाईनं शिकता येऊ शकतो. ज्या अकॅडमीमध्ये खरंच ज्ञान मिळणार असेल तिथंच पैसे खर्च करा. सोशल मीडियावरील कुठल्याही झगमगाटाला बळी न पडता जिथं योग्य प्रशिक्षण दिलं जाईल, अशाच ठिकाणी प्रवेश घ्यावा, असं प्रियांका यांनी सांगितलं.
advertisement
तसंच या व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि संयम आवश्यक आहे. व्यवसाय सुरू केल्या केल्या ग्राहकांची रांग लागेल असं नाही. तर, तुम्हाला तुमचं कौशल्य ग्राहकांना पटवून द्यावं लागेल. मगच ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास बसेल. त्यामुळे ग्राहकांना सतत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर आपला भर असायला हवा, असं प्रियंका म्हणाल्या. व्यवसायाच्या सुरूवातीला काही अडचणी येतील, त्यांवर कशी मात करायची याचं नियोजनही प्रत्येक टप्प्यावर करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 20, 2024 3:56 PM IST

