महागड्या प्रॉडक्टची गरज नाही पडणार! आंघोळीआधी करा 1 काम, त्वचा होईल तुकतुकीत
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पेशींना आराम मिळतो. ज्यामुळे आपलं मानसिक आरोग्य शांत राहतं. याचाच त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो.
सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी
बलिया : तेल आरोग्यासाठी अत्यंत पोषक असतं. तेलामुळे केस आणि त्वचा दोन्ही सुदृढ राहतात. तेलामुळे केसांचा पोत सुधारतो, त्वचाही तजेलदार आणि तुकतुकीत होते. परंतु तेलानं शरिराला मालिश करण्याचीसुद्धा एक विशिष्ट वेळ आहे.
प्राचीन काळापासून आंघोळीपूर्वी तेलानं संपूर्ण अंगाला मसाज करण्याची परंपरा आहे. याला अभ्यंग म्हणतात. यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया. डॉक्टर दीपक गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
डॉक्टर सांगतात, आंघोळीच्या आधी त्वचेला तेलानं मसाज केल्यास रक्त वाहिन्यांमधला प्रवाह वाढतो. शिवाय त्वचेला आवश्यक ते पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन मिळतं. त्वचेत ओलावा कायम राहतो आणि कोरडेपणा दूर होतो.
तेलाच्या मसाजमुळे पेशींना आराम मिळतो. ज्यामुळे आपलं मानसिक आरोग्य शांत राहतं. याचाच त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो आणि त्वचा अगदी हिऱ्यासारखी चमकदार दिसू लागते. यासाठी नारळाचं, तिळाचं किंवा बदामाचं तेल उत्तम मानलं जातं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Balia,Begusarai,Bihar
First Published :
August 02, 2024 6:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
महागड्या प्रॉडक्टची गरज नाही पडणार! आंघोळीआधी करा 1 काम, त्वचा होईल तुकतुकीत