PSI होण्याची मनात होती जिद्द, हार मानली नाही, तब्बल 8 वेळा मुख्य परीक्षा दिल्यानंतर मिळालं यश

Last Updated:

माजी सैनिकाचा मुलगा असलेल्या अजय याने तब्बल 8 वेळा पीएसआय पदासाठी मुख्य परीक्षा दिली होती. यावेळी मात्र अजय याची पीएसआय पदी निवड झाली असून गावातील गावकऱ्यांनी देखील त्याचं जंगी स्वागत केलंय. 

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही परिस्थितीतून आपण मार्ग काढू शकतो. हेच जालना जिल्ह्यातील उज्जैनपुरीच्या अजय शिंदे याने सिद्ध करून दाखवले आहे. माजी सैनिकाचा मुलगा असलेल्या अजय याने तब्बल 8 वेळा पीएसआय पदासाठी मुख्य परीक्षा दिली होती. मात्र तरीही यश त्याला हुलकावणी देत होतं. यावेळी मात्र अजय याची पीएसआय पदी निवड झाली असून गावातील गावकऱ्यांनी देखील त्याचं जंगी स्वागत केलंय.
advertisement
कसं मिळवलं यश?
जालना शहरापासून 30 किमी दूर असलेल्या उज्जैनपुरी गावातील अजय शिंदे या तरुणाने नुकत्याच लागलेल्या पीएसआय पदाच्या निवड यादीत स्थान पटकावलं आहे. अजय याचे वडील भारतीय सैन्यात सैनिक म्हणून नोकरीस होते. निवृत्त झाल्यानंतर शेतामध्ये झालेल्या एका अपघातात त्यांचे निधन झालं. वडिलांचे निधन झाल्यानंतर अजय आणि त्याचा भाऊ संजय असे सगळेच कुटुंब प्रचंड खचून गेलं होतं मात्र यावरही मात करत अजय शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची बाजी लावली.
advertisement
वडिलांचं निधन अन् भावाने दिली खंबीर साथ, पावणे नऊ वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर शुभांगी झाली फौजदार
अजय याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण हे गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या कंडारी बुद्रुक या गावात झाले. अकरावी आणि बारावीसाठी त्याने परभणी गाठून शिक्षण पूर्ण केले तर तर पदवीचे शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम कॉलेजमध्ये पूर्ण केले.
advertisement
सुरुवातीला अजय शिंदेने छत्रपती संभाजीनगर येथे पाच ते सहा वर्ष अभ्यास केला. कोरोना आल्यामुळे एक ते दीड वर्ष घरी राहूनच अभ्यास करावा लागला. या काळात प्रचंड मानसिक त्रास देखील झाला. त्यानंतर मात्र अजय याने पुण्याला जाऊन एमपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर काहीतरी पद मिळूनच पुण्यातून बाहेर पडायचं असा ठाम निश्चय केला. त्याच्या या प्रवासात त्याच्या आई आणि भावाची त्याला भक्कम साथ लाभली.
advertisement
photos : बायकोच्या सांगण्यावरुन नोकरी सोडली, कर्ज काढलं अन् व्यवसाय केला सुरू, आज नशीबच पालटलं
आता खूप छान वाटतंय एवढ्या दिवस जो संघर्ष केला तो फळाला आल्याचे समाधान आहे. माझी आई, भाऊ, काका, मामा या सगळ्यांनी मला खूप जास्त पाठिंबा दिला. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. नवीन एमपीएससी करणाऱ्या मुलांना मी एवढेच सांगू शकेल की जिद्द आणि संयम हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं, अशी भावना अजय शिंदे याने व्यक्त केली.
मराठी बातम्या/करिअर/
PSI होण्याची मनात होती जिद्द, हार मानली नाही, तब्बल 8 वेळा मुख्य परीक्षा दिल्यानंतर मिळालं यश
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement