बारावीच्या निकालानंतर मिशन अॅडमिशन, मुंबईत पदवीसाठी उद्यापासून प्रवेश, कॉलेज कधी सुरू?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Graduation Admission: बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर पदवी प्रवेशाच्या प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठ कार्यक्षेत्रात 8 मेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत.
मुंबई : बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठात पदवीच्या 3 आणि 4 वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी उद्या, 8 मेपासून नावनोंदणी सुरू होणार आहे. 23 मेपर्यंत अर्ज सादर करता येतील, तर 27 मे रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील विविध विभागांमधील प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया होणार आहे. यामध्ये 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि 4 वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिटनुसार प्रवेश दिले जातील. बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी संकेतस्थळावर करावी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक
संबंधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्जविक्री 8 मे ते 23 मे दरम्यान करण्यात येईल. त्यानतंर विद्यापीठ संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 8 मे ते 23 मे दरम्यानच असेल. पहिली मेरिट लिस्ट 27 मे ला जाहीर होईल. त्यानंतर ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा 28 मे ते 30 मे दरम्यान असेल. दुसरी मेरिट लिस्ट 31 मे रोजी जाहीर होईल. त्यानंतर ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा 2 जून ते 4 जून या काळात असेल. तिसरी लिस्ट 5 जून रोजी जाहीर होईल. तर ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा 6 जून ते 10 जून दरम्यान राहील. महाविद्यालयाचे वर्ग 13 जून रोजी सुरू होतील.
advertisement
या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया
मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए- एमएमसी, बीएसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), तसेच बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएससी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (ह्यूमन सायन्स), बी. व्होक. (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनालिटिकल सायन्स, टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय बीएस्सी (बायोएनालिटिकल सायन्स एकात्मिक अभ्यासक्रम) यासह विविध अनुदानित, विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
बारावीच्या निकालानंतर मिशन अॅडमिशन, मुंबईत पदवीसाठी उद्यापासून प्रवेश, कॉलेज कधी सुरू?