Education: आर्थिक अडचणींमुळे मुलींचं शिक्षण थांबणार नाही; सरकारनं आणलीय ही खास योजना
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Girls Education Loan Offer: सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला बँकांकडून साडेसात लाख रुपयांचे एज्युकेशन लोन म्हणजेच शैक्षणिक कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतचे एज्युकेशन लोन मिळेल.
मुंबई : अनेकदा आर्थिक अडचणींमुळे मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. पण पीएम मोदींनी सुरू केलेली पीएम विद्या लक्ष्मी योजना ही फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही फायद्याची आहे. तुमच्या मुलीचं शिक्षण आर्थिक समस्यांशिवाय व्हावं, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. बोर्डाची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यावर तिच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही लोन घेऊ शकता.
सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला बँकांकडून साडेसात लाख रुपयांचे एज्युकेशन लोन म्हणजेच शैक्षणिक कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतचे एज्युकेशन लोन मिळेल. तुम्हाला पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती आणि एज्युकेशन लोनशी संबंधित सर्व माहिती vidyalakshmi.co.in/Students/ याठिकाणी मिळेल. तुम्ही येथे ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.
advertisement
तुमच्या मुलीला मदत करा आणि तिच्या नावाची नोंदणी विद्या लक्ष्मी पोर्टलवर करा आणि लॉग इन करा. यानंतर, तुम्हाला सर्व आवश्यक डिटेल्स भरून Common Education Loan Application (सीईएलएएफ) भरावे लागेल. सीईएलएएफ हा एकच फॉर्म आहे जो तुम्ही अनेक बँका आणि योजनांमध्ये एज्युकेशन लोनसाठी अर्ज करण्यासाठी भरू शकता. हा फॉर्म इंडियन बँक्स असोसिएशनकडून जारी केला जातो. सर्व बँका हा अर्ज स्वीकारतात. फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार एज्युकेशन लोन सर्च करा आणि तुमच्या गरजा, पात्रता आणि सोयीनुसार अर्ज करू शकता. विद्या लक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थी सीईएलएएफच्या माध्यमातून जास्तीत जास्त तीन बँकांमध्ये अर्ज करू शकतात.
advertisement
या योजनेत 13 बँका कव्हर होतात आणि 22 प्रकारची एज्युकेशन लोनही दिली जातात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्यात, आधार कार्ड किंवा व्होटर आयडी, पॅन कार्ड व्यतिरिक्त पासपोर्ट साइज फोटो, तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आधार, व्होटर आयडी किंवा वीज बिल या कागदपत्रांची गरज भासेल. याशिवाय आई-वडिलांच्या उत्पन्नाचा दाखलाही लागेल. सोबतच हायस्कूल आणि इंटरच्या मार्कशीटच्या फोटोकॉपी द्याव्या लागतील. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या संस्थेत मुलगी शिक्षणासाठी जाणार आहे तिथलं ॲडमिशन कार्ड लागेल. सर्व प्रकारच्या खर्चाची माहिती तुम्हाला द्यावी लागेल, तसेच हा कोर्स किती कालावधीसाठी आहे हेही तुम्हाला सांगावं लागेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2024 12:07 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Education: आर्थिक अडचणींमुळे मुलींचं शिक्षण थांबणार नाही; सरकारनं आणलीय ही खास योजना


