Mobile problem : बोलता बोलता मध्येच कट होतो फोन; 'कॉल ड्रॉप' होण्याचं नेमकं कारण काय?
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
कॉल ड्रॉप हा सध्या फक्त ग्राहकांसाठीच नव्हे तर अगदी टेलिकॉम कंपन्यांसाठीही डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्याची कारणं आज तुम्हाला सांगणार आहोत.
नवी दिल्ली : मोबाईल वापरत असाल तर कॉल ड्रॉपचा त्रास आता तुमच्याही सवयीचा झाला असेल. एवढे कॉल ड्रॉप होतात तर कशाला आपण मोबाईल वापरतो? रिचार्ज करतो किंवा बिल भरतो असंही तुम्हाला वाटत असेल. पण कॉल ड्रॉप हा सध्या फक्त ग्राहकांसाठीच नव्हे तर अगदी टेलिकॉम कंपन्यांसाठीही डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्याची कारणं आज तुम्हाला सांगणार आहोत.
सतत कॉल ड्रॉप होण्यामागे फक्त टेलिकॉम कंपन्यांचा ढिसाळपणा हे एकच कारण नाही. उलट आता कॉल ड्रॉपमागे असलेल्या कारणांचा बंदोबस्त करता करता टेलिकॉम कंपन्यांच्या नाकी नऊ आले आहेत. मोबाईल टॉवरवरुन महत्त्वाच्या उपकरणांची चोरी करणाऱ्या टोळ्यांमुळे कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढत आहे. हे चोर चांगलेच हायटेक आहेत. गेल्या काही महिन्यात देशभरातील मोबाईल टॉवर्सवरुन सुमारे 17 हजार रेडिओ रिसिव्हर्स या हायटेक चोरांनी चोरले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहकांना नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. शिवाय फोन लागल्यानंतर कॉल ड्रॉप होण्याचं प्रमाणही बरंच वाढलं.
advertisement
17,000 पेक्षा जास्त रेडिओ रिसिव्हर्स चोरीला
टेलिकॉम कंपन्यांचे थोडेथोडके नव्हे तर 17,000 पेक्षा जास्त रेडिओ रिसिव्हर्स चोरीला गेले आहेत. यात भारती एअरटेलचे 15,000, रिलायन्स जिओचे 1748 तर व्होडाफोन आयडियाचे 368 रेडिओ रिसिव्हर्स चोरीला गेले आहेत. राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात या चोरीचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबचा क्रमांक लागतो. गेल्या दोन महिन्यात एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 2,000 रेडिओ रिसिव्हर चोरीला गेले आहेत. नोएडामध्ये ही संख्या 570 तर गाजियाबादमध्ये 390 एवढी आहे. गाजियाबादमध्ये अशा चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
advertisement
चीन, बांग्लादेशमध्ये विक्री
view commentsचोरी केलेले ही रेडिओ रिसिव्हर भंगारात घालून चीन, बांग्लादेशमध्ये विकले जात आहेत. तिथे ते रिसेट करुन पुन्हा वापरले जात आहेत. एका युनिटची किंमत सुमारे तीन ते पाच लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. कंपन्यांनी दूरसंचार विभागाला पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. शिवाय सर्व राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांकडून अशा बाबतीत तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. केंद्राकडून राज्यातील ब्रॉडबॅंड कमिटीला हा मुद्दा लावून धरण्याची मागणी करण्यात आली आहे. टेलिकॉम कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलं आहे.
Location :
Delhi
First Published :
May 31, 2024 3:54 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Mobile problem : बोलता बोलता मध्येच कट होतो फोन; 'कॉल ड्रॉप' होण्याचं नेमकं कारण काय?


