दररोज 12 किमी पायी चालला, फी भरण्यासाठी आईनं विकले दागिने, मुलानं करुन दाखवलं, NEET मध्ये मिळवले तब्बल इतके गुण

Last Updated:

बारावीच्या शिक्षणानंतर बाडमेर येथे नीटच्या कोचिंगसाठी जायचे असताना वडिलांकडे पैसे नव्हते तर आईने आपले चांदीचे कडे विकले आणि त्याने बाडमेर येथे जाऊन नीटचे कोचिंग घेतले.

प्रेरणादायी कहाणी
प्रेरणादायी कहाणी
मनमोहन सेजू, प्रतिनिधी
बाडमेर : असं म्हणतात की, मुलाची काळजी सर्वात जास्त ही त्याच्या आईला हवी असते. बारावीची परीक्षा पास केल्यानंतर एका मुलाला नीट परिक्षेच्या कोचिंगसाठी पैसे नव्हते. तेव्हा त्याच्या आईने आपले चांदीचे कडे विकले आणि मुलाच्या कोचिंगची फी भरली आणि या मुलानेही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत नीटच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आहे. आज हा मुलगा गावातील पहिला डॉक्टर होणार आहे. जाणून घेऊयात, ही यशस्वी कहाणी.
advertisement
बाडमेर येथील मीठा बेरा येथील विक्रम जांगीड याची ही कहाणी आहे. बारावीच्या शिक्षणानंतर बाडमेर येथे नीटच्या कोचिंगसाठी जायचे असताना वडिलांकडे पैसे नव्हते तर आईने आपले चांदीचे कडे विकले आणि त्याने बाडमेर येथे जाऊन नीटचे कोचिंग घेतले. यानंतर नीटच्या परिक्षेत त्याने चांगले यश मिळवले आहे. त्याला 720 पैकी 700 गुण मिळवले आहे.
advertisement
वाह! एकाच कुटुंबातील दोन बहिणींची कमाल, दोन्ही झाली नायब तहसिलदार तर दुसरी…
पहिल्याच प्रयत्नात त्याने नीट परीक्षा पास केली आहे. त्याचे वडील रुखाराम जांगीड रुग्णालयात प्रयोगशाळा सहाय्यक आहेत. ज्यावेळी विक्रमच्या कोचिंगसाठी जायचे होते, त्यावेळी त्याच्या वडिलांचा पगार 6 हजार रुपये होता. त्यामुळे विक्रमची आई गोमती देवी यांनी आपले चांदीचे कडे विकून मुलासाठी पैसे जमवले. विक्रम आपल्या गावातील पहिला डॉक्टर होणार आहे.
advertisement
हातात हात घालत दोन्ही तरुणी पोलीस ठाण्यात, म्हणाल्या, 'आम्हाला एकमेकींसोबत निकाह करायचाय', नेमकं काय घडलं?
विक्रमचे सुरुवातीचे शिक्षण हे त्याच्या गावापासून 6 किलोमीटर दूर राउमावि बामणोर, भंवरशाह याठिकाणी झाले. त्यामुळे त्या अकरावीपर्यंत दररोज 12 किलोमीटर पायी चालावे लागले. दहावीत त्याने 90 टक्के आणि बारावीतल 96.08 टक्के गुण मिळवले होते. विक्रमची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
दररोज 12 किमी पायी चालला, फी भरण्यासाठी आईनं विकले दागिने, मुलानं करुन दाखवलं, NEET मध्ये मिळवले तब्बल इतके गुण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement