पुणे महापालिकेत नोकरीची संधी, 682 पदांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी असून पुणे महानगर पालिकेत नोकरी करता येणार आहे. तब्बल 682 पदांसाठी या ठिकाणी भरती होत असून तातडीने अर्ज करावा लागणार आहे.
पुणे : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पुणे महानगर पालिकेत तब्बल 682 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. याबाबत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. विविध पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी 19 ऑगस्टपर्यंत ऑलनाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुदत अत्यल्प असल्याने उमदेवारांना तातडीने अर्ज करावे लागणार आहेत.
कोणत्या पदांसाठी होतेय भरती?
पुणे महापालिकेत विविध 682 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालीये. पुणे महानगर पालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून नुकतंच पालिकेनं याबाबत अधिसूचना जारी केलीय.
advertisement
दरम्यान, इच्छुकांना अर्ज लवकरात लवकर करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत काही दिवसच शिल्लक राहिलीये. त्यामुळे 19 ऑगस्ट पूर्वी पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे. पुण्यात नोकरीची संधी पाहिजे असेल तर उमेदवारांना तातडीनं अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच याबाबत अधिक माहितीही महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 16, 2024 11:23 AM IST


