Job Alert : भारत सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची संधी, अनेक पदांसाठी पदभरती, वाचा संपूर्ण माहिती

Last Updated:

मिंटमधील भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी ठेवण्यात आली आहे. यासाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
पीयूष पाठक, प्रतिनिधी
अलवर : नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित संस्थेत भरती निघाली झाली. कोणत्या संस्थेत, कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे, तसेच अर्ज करण्याचे स्वरुप, शेवटची तारीख काय आहे हे जाणून घेऊयात.
अनेक दिवसांपासून भारत सरकारमध्ये चांगल्या नोकरभरतीच्या प्रतीक्षा असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकार मिंट या संस्थेत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. याठिकाणी अनेक पदे भरली जाणार आहे. तसेच या अर्जाची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी https://igmkolkata.spmcil.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
advertisement
फी कशी जमा करावी -
भारत सरकार मिंट संस्थेत भरतीसाठी अर्जाची फी म्हणून ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील लोकांना 600 रुपये जमा करावे लागतील. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी अर्ज शुल्क 200 रुपये ठेवण्यात आले आहे. शुल्क फक्त ऑनलाइन स्वरुपात भरता येणार आहे.
advertisement
वयोमर्यादा काय -
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 एप्रिल 2024 रोजी मोजले जाईल. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता काय हवी -
मिंटमधील भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी ठेवण्यात आली आहे. यासाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात. तसेच शैक्षणिक पात्रता पाहिल्यानंतर अर्ज करू शकतात.
advertisement
या पदांसाठी निघाली भरती -
भारत सरकारच्या वतीने निघालेल्या या भरतीमध्ये प्रक्रियेत विविध पदांसाठी पदभरती केली जाणार आहे. यामध्ये लॅब टेक्निशियन, असिस्टंट ज्यूनियर टेक्निशियन, मेटल वर्क या पदांवर भरती होणार आहे.
पगार आणि परीक्षेची तारीख काय -
याठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना 23910-85570 मानधन दिले जाईल. अधिक माहितीसाठी, तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://igmkolkata.spmcil.com/ या वेबसाईटवर संपर्क करावा.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Job Alert : भारत सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची संधी, अनेक पदांसाठी पदभरती, वाचा संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement