100 रुपये घेऊन धुळ्याहून मुंबईत, आज 11,560 कोटी रुपयांचे मालक; सुभाष रुणवाल यांची सक्सेस स्टोरी!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
एके काळी खिशात फक्त 100 रुपये घेऊन सुभाष रुणवाल हे मुंबई नामक मायानगरीत आले. आज ते देशातल्या सर्वांत मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची जीवनकहाणी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखी वाटली तर आश्चर्य वाटायला नको.
नवी दिल्ली : आलेल्या संकटांना धैर्याने तोंड दिलं, तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर मात करता येते. देशात असे अनेक लोक आहेत. गरीब परिस्थितीशी दोन हात करत ते आज जिथे पोहोचले आहेत तो प्रवास निव्वळ थक्क करणारा आहे. एके काळी खिशात फक्त 100 रुपये घेऊन सुभाष रुणवाल हे मुंबई नामक मायानगरीत आले. आज ते देशातल्या सर्वांत मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची जीवनकहाणी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखी वाटली तर आश्चर्य वाटायला नको.
बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख लाभलेल्या शाहरूख खानचे अब्जाधीश शेजारी अशीही सुभाष रुणवाल यांची आणखी एक ओळख आहे. 1964मध्ये महाराष्ट्रातल्या धुळे या छोट्याशा गावातून ते मुंबईत आले. त्यांच्याकडे तेव्हा फक्त 100 रुपये होते. त्यांना चार्टर्ड अकाउंटंट (सीए) व्हायचं होतं. प्रचंड मेहनत करून ते सीए झाले. या काळात मुंबईत ते एका खोलीत राहत होते. 1967मध्ये ते अमेरिकेला गेले. त्यांनी तिथल्या अर्न्स्ट ॲंड अर्न्स्ट या अमेरिकन कंपनीत नोकरीही सुरू केली; पण तिथली लाइफस्टाइल आवडली नाही, म्हणून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. परत आल्यावर त्यांनी एका केमिकल कंपनीत नोकरी केली.
advertisement
पुढे 1978मध्ये रुणवाल रिअल इस्टेटमध्ये उतरले. ठाण्यात 10,000 स्क्वेअर फुटांच्या हाउसिंग सोसायटीचा प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला. रुणवाल नगर या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये 16 टॉवर होते. त्यांचा मुलगाही पुढे या क्षेत्रात आला आणि त्यांनी मुलुंडमधला आर-मॉल, घाटकोपरमधला आर-सिटी मॉल यांसारखे प्रोजेक्ट केले.
फोर्ब्जच्या माहितीनुसार, सुभाष रुणवाल हे अत्यंत यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. डिसेंबर 2023पर्यंत त्यांची संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 11,560 कोटी रुपये एवढी असल्याची माहितीही फोर्ब्जकडून देण्यात आली आहे. भारतातल्या सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांमध्ये त्यांचा समावेश होतो. धुळ्यासारख्या एका छोट्या गावातून आलेल्या रुणवाल यांचा बांद्र्यातल्या समुद्र किनाऱ्यावर आलिशान बंगला आहे. शाहरुख खानचा ‘मन्नत’ हा बंगलाही याच परिसरात आहे. त्यामुळे शाहरुखचे शेजारी म्हणूनही रुणवाल यांचा उल्लेख केला जातो. रुणवाल यांचा धुळे ते बांद्रा व्हाया अमेरिका आणि बांधकाम व्यावसायिक व्हाया सीए हा प्रवास कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2024 2:32 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
100 रुपये घेऊन धुळ्याहून मुंबईत, आज 11,560 कोटी रुपयांचे मालक; सुभाष रुणवाल यांची सक्सेस स्टोरी!


