दोस्ती अशी भारी, तिघेही एकत्रच झाले न्यायाधीश, गावातल्या पोरांनी अख्ख्या पुण्याला दाखवलं! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
शिक्रापूरच्या शुभम कराळे, बुरुंजवाडीच्या सागर नळकांडे आणि कारेगावच्या अक्षय ताठे या तीन जिगरी मित्रांनी एकत्र अभ्यास करून MPSC च्या परीक्षेत यश मिळवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पद मिळवले आहे.
पुणे : पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक प्रेरणादायी आणि मैत्रीला नवा आयाम देणारी यशोगाथा समोर आली आहे. शिक्रापूरच्या शुभम कराळे, बुरुंजवाडीच्या सागर नळकांडे आणि कारेगावच्या अक्षय ताठे या तीन जिगरी मित्रांनी एकत्र अभ्यास करून MPSC च्या परीक्षेत यश मिळवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पद मिळवले आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याचे नाव उंचावले आहे.
शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील हे तीन मित्र, शुभम, सागर आणि अक्षय, यांनी एकत्र येऊन आपले ध्येय ठरवले. सुरुवातीला वकिलीची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर एकत्र मार्गक्रमण केले. एकमेकांच्या अभ्यासाला मदत करत, प्रचंड मेहनत घेत त्यांनी MPSC च्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आणि आता तीनही मित्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायदानाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
advertisement
'आम्ही एकत्र अभ्यास सुरू केला आणि एकमेकांना मदत करत राहिलो. आमच्या यशाचं श्रेय मेहनतीसह आमच्या घट्ट मैत्रीला जातं' अशी माहिती शुभम कराळे न्यायदंडाधिकारी यांनी दिली आहे.
'स्पर्धा परीक्षा ही खूप मेहनतीची आणि चिकाटीची गरज असते. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याने सतत प्रोत्साहन देत राहिलो आणि आज आम्ही न्यायाधीश पदावर पोहोचलो' अशी माहिती सागर नळकांडे न्यायदंडाधिकारी यांनी दिली आहे.
advertisement
'हे यश आमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण शिरूर तालुक्यासाठी आहे. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत घेत आहेत. त्यांनाही यश मिळावे, यासाठी आम्ही नेहमी मार्गदर्शन करणार आहोत' अशी माहिती अक्षय ताठे न्यायदंडाधिकारी यांनी दिली आहे.
ही गोष्ट फक्त तिघांच्या मेहनतीची नसून मैत्री, समर्पण आणि कठोर परिश्रमाने घडलेल्या स्वप्नपूर्तीची आहे. भविष्यात ही तिघे राज्यातील वेगवेगळ्या न्यायालयांत न्यायदानाची जबाबदारी पार पाडतील. त्यांच्या या यशाने शिरूर तालुक्यातील तरुणांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
advertisement
शिरूर तालुक्यातील या तिघांच्या यशाने जिल्ह्यात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. मैत्रीच्या आणि मेहनतीच्या बळावर कसे यश मिळवता येते, हे या तीन मित्रांनी दोस्तीच्या अशाही या दुनियादारी दाखवून दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 08, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दोस्ती अशी भारी, तिघेही एकत्रच झाले न्यायाधीश, गावातल्या पोरांनी अख्ख्या पुण्याला दाखवलं! Video