खूशखबर! शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी, लगेच करा ऑनलाईन अर्ज, पात्रता काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
शिवाजी विद्यापीठातील सहाय्याक प्राध्यापकांच्या 72 पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत आहे.
कोल्हापूर : प्राध्यापक होण्याची स्वप्नं बघणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 72 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर 2022 ला राज्यातील विविध 15 अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा 659 पदांच्या भरतीला मान्यता दिली. यात कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या तब्बल 72 पदांच्या भरतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला. आता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
advertisement
सहाय्यक प्राध्यापकाची 62 पदे
शिवाजी विद्यापीठातील प्राध्याकांच्या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापकांच्या 62 जागा, तर सहयोगी प्राध्यापकांची 10 पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांचे अधिविभागनिहाय रोस्टर तयार करून तपासणी आणि त्यानंतर मान्यतेसाठीचा प्रस्ताव फेब्रुवारीत विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला होता. त्याला मान्यता मिळाली असून, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाहीर केलंय.
advertisement
भरतीसाठी कसा करावा अर्ज ?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे . अध्यापन, वैधानिक पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत . भरण्यासाठी 72 जागा उपलब्ध आहेत . यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर सबमिट करू शकतात. या भरतीचा तपशील, रिक्त जागे बद्दल अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
कोणती पदे भरणार?
72 पदांमध्ये विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक, प्रशिक्षक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक संचालक अशा पदांचा समावेश आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक - 43 पदे, प्रशिक्षक (सहाय्यक प्राध्यापक समतुल्य) - 02, प्रकल्प अधिकारी (सहाय्यक प्राध्यापक समतुल्य) - 01, सहाय्यक संचालक / सहाय्यक प्राध्यापक - 16 पदे भरली जाणार आहेत.
advertisement
अर्ज करण्यासाठी नियम व अटी..
view commentsइच्छुक पात्रताधारकांना 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच अर्जाच्या सहा हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 25/11/2024 आहे. मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या पात्र उमेदवारांपैकी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी आणि मुलाखतीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवाराने अर्जात नमूद केलेले नाव, पोस्टल पत्ता, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक नमूद करावेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 19, 2024 4:03 PM IST


