Ssc Result : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, 48 व्या वर्षी केली दहावी पास, असं मिळवलं यश, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सोलापूर शहरातील सुनीता रपुरे वय 48 यांनी दहावीत यश मिळवले आहे.
सोलापूर : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सोलापूर शहरातील सुनीता बालाजी रपुरे वय 48 यांनी 44 टक्के गुण प्राप्त करून दहावीत यश मिळवले आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सुनीता यांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागली होती. परंतु शिक्षण शिकण्याची गोडी असल्याने सुनीता रपुरे यांनी पुन्हा इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण शिकण्यास सुरुवात केली. घरातील कामे करून संध्याकाळी साडेसहा ते नऊ पर्यंत त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्ये याठिकाणी शिक्षण घेत.
सुनिता या सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट येथे राहतात. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सुनीता यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. काही कालांतराने त्यांचे लग्नही झाले. पण शिक्षण शिकण्याची गोडी त्यांनी काही सोडली नाही. घरातल्या लोकांची चर्चा करून त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामे आटपून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत शाळेला जात होत्या.
advertisement
त्यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीच्या परीक्षा दिली असून या दहावीच्या परीक्षेत त्यांना 44 टक्के गुण मिळाले आहेत. शिक्षण घेण्याला वयाची मर्यादा नाही. म्हणून त्यांनी देखील परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि दहावी उत्तीर्ण झाल्या. सुनीता रापुरे या पास झाल्यावर घरातील लोकांनी शाळेत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे. तर आता सुनीता रपुरे या अकरावीमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणार असल्याची माहिती लोकल 18 शी बोलताना दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 15, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Ssc Result : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, 48 व्या वर्षी केली दहावी पास, असं मिळवलं यश, Video







