Teachers Day 2025: ‘विना छताची शाळा’, भगवान देतोय गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे, Video पाहुन कराल कौतुक

Last Updated:

भगवान सदावर्ते हे संभाजीनगर शहरामध्ये विना छताची शाळा चालवतात आणि अनेक असे जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देण्याचे ते काम करतात.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : शाळा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कसं छान असं चित्र निर्माण होतं. शाळेमध्ये वर्गातील काळा फळा, बेंच, आपले मित्र-मैत्रिणी त्यासोबत छान रंगवलेल्या भिंती आणि त्या भिंतीवर छान छान दिलेले वाक्य किंवा इतर काढलेले चित्र असं आपण साधारणपणे शाळेचे चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करतो. पण तुम्ही कधी विना छताची शाळा ऐकली आहे का? होय, विना छताची शाळा ही शाळा अशी आहे. या शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंच नाहीयेत, त्याचबरोबर रंगवलेल्या भिंती नाहीयेत अशी देखील एक शाळा आहे आणि ही शाळा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहे. भगवान सदावर्ते हा तरुण ही शाळा चालवतो.
भगवान सदावर्ते हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील चिंचोली सांगळे गावाचे. त्यांचं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा केली आणि त्यासोबतच आता ते सध्या लॉचे शिक्षण घेतात. भगवान सदावर्ते यांचे आई-वडील मोलमजुरीचे काम करून आपला उदारनिर्वाह करतात. भगवान सदावर्ते हे संभाजीनगर शहरामध्ये विना छताची शाळा चालवतात आणि अनेक असे जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देण्याचे ते काम करतात.
advertisement
‎लॉकडाऊनच्या दरम्यान भगवान सदावर्ते यांना काही मुलं ही ड्रग्स घेताना आढळली आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की या मुलांना जर आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, तर यांचं आयुष्य सुधरेल. म्हणून त्यांनी ठरवले की आपण या मुलांना शिक्षण देऊयात. सुरुवातीला जेव्हा भगवान सदावर्ते हे त्या मुलांच्या घरी गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सुरुवातीला मुलांच्या पालकांना असं वाटले की हा आपल्या मुलाला किडनॅप करेल किंवा हा कोणीतरी वेगळाच मुलगा आहे. त्यामुळे त्यांना त्या लोकांनी काही एक विचारलं नाही आणि त्यांची कुठलीच गोष्ट ऐकून घेतली नाही. त्यासोबतच त्यांना शिवीगाळ देखील केलेली आहे.
advertisement
त्यानंतर भगवान यांनी त्या मुलांच्या घरी गेले, त्यांच्यासोबत जेवण केलं, त्यांच्या आई-वडिलांसोबत जेवण केलं, त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारल्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्या आई-वडिलांना यांच्यावरती विश्वास बसायला लागला आणि त्यांनी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन शाळा घ्यायला सुरुवात केली. आणि एका लिंबाच्या झाडाखाली त्यांनी सगळ्यात पहिले शाळा घ्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी एक पाटी लावली, त्यावर लिहिलं विना छताची शाळा.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील ते बाबा पेट्रोल पंपजवळ असणाऱ्या भाग्यनगर या ठिकाणी एक छोटीशी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये जाऊन ते मुलांना शिकवतात. त्याचबरोबर शहरातीलच वाळूज परिसरामध्ये जाऊन देखील ते मुलांना शिक्षण देतात. तसेच शहरातील हनुमान टेकडी परिसरामध्ये अनेक विविध भट्टी आहेत, त्या ठिकाणी देखील जाऊन ते मुलांना शिक्षण देतात, असं भगवान सदावर्ते सांगतात.
advertisement
‎वाळूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी एरिया आहे आणि त्या ठिकाणी अनेक असे मुलं आहेत जे शाळेपासून आणि शिक्षणापासून वंचित आहेत, तर त्यांना ते शिकवण्याचं काम करतात. दररोज संध्याकाळी ते जातात, त्या मुलांना शिकवतात आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांनी अनेक मुलांना शाळेमध्ये देखील प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं आहे. त्यासोबतच ते प्रत्येक मुलाला पाहिजे तशी मदत करतात.
advertisement
मराठी बातम्या/करिअर/
Teachers Day 2025: ‘विना छताची शाळा’, भगवान देतोय गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे, Video पाहुन कराल कौतुक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement