दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? कन्फ्यूज झालात? टेन्शन नका घेऊ, फाॅलो करा 'या' टिप्स; निर्णय अचूक घ्याल
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दहावीचा निकाल लागल्यानंतर योग्य प्रवाह निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयांवर आणि ज्या विषयात चांगले गुण मिळाले आहेत त्यावर आधारित प्रवाह निवडू शकतात. करिअरच्या संधी आणि...
दहावी पास झालात, आता तुमच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे, अकरावीसाठी आर्ट्स (कला), कॉमर्स (वाणिज्य) आणि सायन्स (विज्ञान) यापैकी कोणती शाखा निवडायची. बहुतेक विद्यार्थ्यांची याच वेळी गडबड होते, कारण भविष्यासाठी योग्य निवड कशी करायची हे त्यांना समजत नाही. काळजी करू नका, तुमच्यासाठी योग्य आणि उत्तम शाखा निवडण्यासाठी काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगतो, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.
तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार शाखा निवडा
तुम्हाला कोणता विषय वाचायला आवडतो, तुमचा आवडता विषय कोणता आहे, यावर लक्ष द्या आणि त्या संबंधित शाखा निवडा. जर तुम्हाला काहीच समजत नसेल, तर तुमचा निकाल बघा आणि ज्या विषयात तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत, त्या संबंधित शाखेचा विचार करा. कारण ज्या विषयात तुम्हाला आवड आहे, त्यात तुम्ही नक्कीच चांगली प्रगती करू शकता.
advertisement
दबावाखाली निर्णय घेऊ नका
अनेकदा असं होतं की, विद्यार्थी त्यांच्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन शाखा निवडतात. किंवा तुमचा मित्र-मैत्रिणी जी शाखा निवडतात, तीच तुम्ही निवडता. पण ही चूक करू नका. तुम्हाला जे आवडतं, ज्यात तुमची रुची आहे, तीच शाखा निवडा. कारण आवड असेल तर तुम्ही त्यात मन लावून अभ्यास करू शकता.
तुमचं करिअर आणि भविष्य लक्षात ठेवा
कोणतीही शाखा निवडताना, त्या शाखेत भविष्यात काय संधी आहेत, याचा विचार नक्की करा. अशी शाखा निवडा ज्यात तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे, चांगला पगार मिळू शकतो आणि ज्याची बाजारात जास्त मागणी आहे. यासाठी तुम्ही जाणकारांचा सल्ला घेऊ शकता.
advertisement
शिक्षकांची मदत घ्या
अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्या शिक्षकांची मदत जरूर घ्या. कारण ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं आहे, त्यांना तुमची क्षमता चांगली माहीत असते. ते तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देऊ शकतील की तुमच्यासाठी कोणती शाखा उत्तम आहे.
तुमचं बजेट लक्षात ठेवा
कोणतीही शाखा निवडण्यापूर्वी तुमच्या घरचं आर्थिक बजेट लक्षात घ्या. तुम्हाला जी शाखा घ्यायची आहे, तिचा खर्च तुमच्या कुटुंबाला परवडेल का? आर्थिक बाजूचा विचार करूनच निर्णय घ्या.
advertisement
हे ही वाचा : बारावी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनो लाखोंमध्ये कमाई करायचीय? तर 'हे' आहेत करिअरचे 10 बेस्ट पर्याय, वाचा सविस्तर
हे ही वाचा : दहावी-बारावी झालीय, पण करिअर कोणतं निवडायचं? गोंधळात पडू नका, फाॅलो करा 'या' 5 टिप्स, अचूक निर्णय घ्याल!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 31, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? कन्फ्यूज झालात? टेन्शन नका घेऊ, फाॅलो करा 'या' टिप्स; निर्णय अचूक घ्याल