भर लग्नात माशाच्या जेवणावरून वधू-वर पक्षात तुफान राडा, एकमेकांची फोडली डोकी, नवऱ्याने काढला पळ
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
उत्तर प्रदेशातील पथेरवा गावात लग्नसोहळ्यात माशाच्या जेवणावरून वर-वधू पक्षात हाणामारी झाली. गोंधळात नवरा मंडपातून पळाला. पोलीस हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांत समेट झाला आणि लग्नसोहळा पहाटे पूर्ण झाला.
उत्तर प्रदेशातील पथेरवा गावात एका लग्नसोहळ्यात माशाच्या जेवणावरून झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. वधू आणि वर पक्षातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांचा वापर करत झालेल्या या भांडणात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले.
वरातीतील लोकांचं स्वागत करण्यासाठी लग्नात माशांचं जेवण करण्याचं नियोजन होतं. मात्र, कोण माशाचे जेवण करणार, यावरून वाद उफाळला. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
या गोंधळात काही नशेत असलेल्या लोकांनी वर आणि वरातीतील लोकांवर हल्ला चढवला. गोंधळात वराने लग्नमंडपातून पळ काढला. त्याला शोधण्यासाठी लगबग सुरू झाली.
advertisement
गावात गोंधळ वाढल्यानंतर पथेरवा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी वराचा शोध घेतला. मात्र, वर लग्नास तयार नव्हता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समेट घडवून आणली. अखेर पहाटे पाच वाजता लग्नसोहळा पूर्ण करण्यात आला.
पथेरवा पोलीस स्टेशनचे अधिकारी दीपक कुमार सिंग यांनी सांगितले की, त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. लग्नसोहळा शांततेत पार पडावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुढील कारवाईसाठी औपचारिक तक्रारीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
हे ही वाचा : अरे बाप रे! बनावट ईडी टीमने सोनाराचं घर अन् दुकान दोन्हीही लुटलं, 25 लाखांचा ऐवज चोरला, 12 जणांना अटक
हे ही वाचा : Solapur : लव्ह मॅरेज, वाद अन् हत्या! पतीला संपवलं अन् पत्नीने स्वत:च पोलिसांना कॉल करून सांगितलं
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 11:11 AM IST
मराठी बातम्या/कोरोना/
भर लग्नात माशाच्या जेवणावरून वधू-वर पक्षात तुफान राडा, एकमेकांची फोडली डोकी, नवऱ्याने काढला पळ