गर्लफ्रेंडच्या मामाने दिली धमकी, 20 वर्षांच्या बाॅयफ्रेंडने संपवलं आयुष्य, 5 वर्षांचं प्रेम क्षणात उद्ध्वस्त
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
20 वर्षीय गोपाल या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील औरैयाचा असून, पानिपतच्या थर्मल कॉलनीत थर्मल प्लांटमध्ये काम करत होता. त्याचे गेल्या ५ वर्षांपासून एका मुलीशी...
एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मामाच्या धमकीमुळे आत्महत्या केली आहे. औरैया जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) मूळ रहिवासी असलेला 20 वर्षांचा गोपाल एका थर्मल प्लांटमध्ये काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोपालचं गेल्या 5 वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होतं. ही मुलगी मूळची औरैयाची असून सध्या कुरूक्षेत्रात राहत होती. दोघेही अनेकदा एकमेकांना भेटायला जात असत. जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना या प्रेमसंबंधांबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी या नात्याला विरोध केला.
मामाच्या धमकीने घेतला जीव
मृत गोपालच्या आत्या प्रिया यांनी आरोप केला आहे की, मुलीच्या मामाने गोपालला जीवे मारण्याची आणि खोट्या पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. याच भीतीमुळे आणि मानसिक तणावामुळे गोपालने बुधवारी संध्याकाळी आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
गुन्हेगारांनी मिळाली पाहिजे शिक्षा
घटनेची माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. कुटुंबीयांच्या जबाबावरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रिया (मृत गोपालची आत्या) यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून न्याय मागितला आहे. आत्या म्हणाल्या, "गोपाल एक साधा मुलगा होता. त्याने फक्त प्रेम केलं, कोणताही गुन्हा केला नाही. आम्हाला गुन्हेगारांना शिक्षा मिळावी अशी इच्छा आहे, जेणेकरून असं कोणासोबतही पुन्हा होणार नाही."
advertisement
हे ही वाचा : दिर वहिनीच्या माहेरी गेला, घरात घुसला अन् भावाच्या सासऱ्याची केली हत्या; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/कोरोना/
गर्लफ्रेंडच्या मामाने दिली धमकी, 20 वर्षांच्या बाॅयफ्रेंडने संपवलं आयुष्य, 5 वर्षांचं प्रेम क्षणात उद्ध्वस्त