खेळण्याच्या बहाण्याने बेडरुममध्ये नेलं अन्..., सांगलीत 17 वर्षीय मुलाचं 8 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sangli : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात एका 17 वर्षीय मुलानं घराशेजारी राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
तासगाव : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय मुलानं घराशेजारी राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी पीडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरात घेऊन गेला आणि बेडरुममध्ये घेऊन जात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईनं तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी देखील अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याची बाल न्याय मंडळासमोर चौकशी केली जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय आरोपी मुलगा आणि 8 वर्षीय पीडित मुलगी एकाच भागात राहतात. 28 जानेवारी रोजी आरोपीच्या घरी कुणीच नव्हतं. याचा फायदा घेत आरोपी चिमुकल्या मुलीला आपल्या घरी घेऊन आला. तिला खेळणं देण्याचं आमिष आरोपीनं दाखलं. पीडित मुलगी घरात आल्यानंतर आरोपी तिला गोड बोलून बेडरुममध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली. आरोपीला घाबरून पीडितेनं कुणालाच काही सांगितलं नाही. मात्र या घटनेच्या 18 दिवसानंतर पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
February 16, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
खेळण्याच्या बहाण्याने बेडरुममध्ये नेलं अन्..., सांगलीत 17 वर्षीय मुलाचं 8 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य


