Ashwini Bidre Case : फाशी की जन्मठेप? अश्विनी बिद्रे प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली शिक्षा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashwini Bidre-Gore Murder Case : गेल्या सात वर्षांपासून चर्चेत असलेल्या API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आज दोषी ठरलेल्या अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा सुनावली.
नवी मुंबई : गेल्या सात वर्षांपासून चर्चेत असलेल्या API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आज दोषी ठरलेल्या अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा सुनावली. मागील सुनावणीत कोर्टाने निकाल सुनावत दोषी अभय कुरुंदकरसह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांनादेखील दोषी ठरवले होते. या दोघांना पुरावे नष्ट करणे आणि इतर आरोपांत दोषी ठरवले.
दोषींना कोणती शिक्षा?
अश्विनी बिद्रे प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, हत्याकांडातील सहआरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी शिक्षा सुनावली.
अश्विनी बिद्रे यांच्या पतीने राजू गोरे यांनी आरोपींकडून भरपाई नको असे सांगितले होते त्यामुळे तसा आदेश करण्यात आलेला नाही. सरकारला कोर्टाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या पगाराची भरपाई देण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्यांच्यावरही कारवाई करावी असे आदेशही कोर्टाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनीही यामध्ये दुर्लक्ष केल असे कोर्टाने मत व्यक्त केले आहे. आरोपीविरोधात कारवाई न करता चौकशी न करता आरोपींना राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणारे अधिकारी अडचणीत आले आहेत.
advertisement
अश्विनी बिद्रे यांची हत्या का झाली?
अश्विनी बिद्रे 2005 मध्ये पोलिस दलात भरती झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले. अश्विनी आणि अभय दोघेही विवाहित होते आणि त्यांना आपापली कुटुंबं होती. पण अभयने अश्विनीला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनीने आपल्या पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहते.
advertisement
तर, अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. पण कुरुंदकरला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. कुरुंदकर त्याच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता, तर अश्विनी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. अश्विनीच्या तगाद्याला वैतागून अखेर कुरुंदकरने तिचा काटा काढण्याचे ठरवत तिला संपवले.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
April 21, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Ashwini Bidre Case : फाशी की जन्मठेप? अश्विनी बिद्रे प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली शिक्षा