बीडच्या कारागृहात चाललंय काय? गांजावरून वाद पेटला, खोक्या भोसलेची पोलिसांना शिवीगाळ
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गांजा वरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ देत कैदी अंगावर धावून गेले.
बीड : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीमुळे तसेच आर्थिक घोटाळ्यांतील आरोपी सुरेश कुटे, बबन शिंदे आणि सतीश ऊर्फ ‘खोक्या’ भोसले यांच्यामुळे बीड जिल्हा कारागृह (गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आले आहे. त्यातच आता पुन्हा हे कारागृह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आता बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला कैद्यांनी धमकी दिल्याने पुन्हा एकदा कारागृह चर्चेत आले आहे.
बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरुन वाद झाला. हा वाद ऐकून तिकडे गेलेल्या कर्मचाऱ्यांना कैद्यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गांजा वरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ देत कैदी अंगावर धावून गेले. तसेच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गंभीर बाब म्हणजे यात खोक्या भोसलेचा देखील समोवश आहे.
advertisement
खोक्या भोसले हा चार गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात असून त्याच्यासह कारागृहात असलेल्या शाम पवार, वसीम पठाण, यमराज राठोड या तिघांमध्ये हा वाद झाला. आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय मोरे हे करत आहेत.
कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर
बीड जिल्हा कारागृहात यापूर्वी देखील गांजा, मोबाईल फोन आढळून आला होता. आता तर गांजा वाटून घेण्यावरुन कैद्यांमध्ये वाद आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याचा प्रकार घडल्याने कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
advertisement
कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या?
सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली. सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.खोक्याने अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. मात्र, खोक्याला आता स्टंटबाजीमुळे जेलची हवा खावी लागत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 10, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीडच्या कारागृहात चाललंय काय? गांजावरून वाद पेटला, खोक्या भोसलेची पोलिसांना शिवीगाळ









