हनीमून झाला अन् सासरी प्रवेश नाकारला, नवविवाहितेचं पतीच्या घरासमोर आंदोलन
- Published by:Kranti Kanetkar
- press trust of india
Last Updated:
नवविवाहित शालिनी सिंघलने सासरच्या मंडळींवर 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला आहे. पती प्रणव सिंघलने हे आरोप फेटाळले असून शालिनीने धमकी दिल्यामुळे तिला घरात प्रवेश नाकारला आहे.
लग्नानंतर सासरी जाताना नववधूच्या मनात अनेक स्वप्ने असतात. मात्र, जर नवऱ्यानेच तिच्या प्रवेशासाठी नकार दिला तर, त्या दुःखाची कल्पनाही करवत नाही. नवरा आणि सासरच्या मंडळींनी नववधूला घरात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आणि सगळा राडा झाला. एका नवविवाहितेने सासरी प्रवेश नाकारल्याने थेट पतीच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे.
मेरठच्या ब्लू ड्रम प्रकरणाची भीती!
नवविवाहित शालिनी सिंघलने आपल्या सासरच्यांवर 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, पती प्रणव सिंघलने हे आरोप फेटाळले असून उलट शालिनीवरच त्याने गंभीर आरोप केले आहेत. प्रणव सिंघलने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले की, मेरठमधील प्रसिद्ध ब्लू ड्रम हत्याकांडामुळे तो आणि त्याचा परिवार घाबरलेला आहे.
advertisement
मेरठमधील घटनेत एका महिलेने प्रियकरासोबत संगनमत करून नवऱ्याची हत्या केली होती आणि मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंटच्या ड्रममध्ये लपवले होते. प्रणवचा दावा आहे की, शालिनीने त्याला आणि कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यामुळेच आम्ही तिला घरात प्रवेश देऊ शकत नाही, असे त्याने सांगितले.
शालिनीचा पतीच्या घरासमोर ठिय्या सुरूच!
शालिनी आणि प्रणव यांचा विवाह 2 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीला दोघेही हनिमूनसाठी इंडोनेशियाला गेले. मात्र, काही मतभेद झाल्यामुळे ते दहा दिवसांतच परतले. शालिनी 5 मार्चपर्यंत सासरी होती, पण 6 मार्चला होळीच्या निमित्ताने ती माहेरी निघून गेली. 30 मार्च रोजी परत आल्यानंतर मात्र तिला घरात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे तिने थेट पतीच्या घरासमोरच आंदोलन सुरू केले आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकारावर पोलिस निरीक्षक रुपाली राव यांनी सांगितले की, अद्याप शालिनीच्या तक्रारीनुसार कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शालिनीचा संघर्ष सुरूच असून तिने सासरी प्रवेश मिळेपर्यंत हटणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
April 02, 2025 1:29 PM IST