पैशांसाठी बालपणीच्या मित्राने केली फसवणूक, भारतीय इंजीनिअरला अडकवले, नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांसाठी बालपणीच्या मित्रानेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
यूएई - गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांसाठी बालपणीच्या मित्रानेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) एका भारतीय इंजीनियरची त्याच्या बालपणीच्या मित्रानेच आर्थिक फसवणूक केली. जेव्हा त्याच्या खात्यात 2100 दिरहाम (जवळपास 48,194.64 रुपये) जमा झाले. इंजीनिअरच्या बालपणीच्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी इंजीनिअरकडून बँक तपशील मागितला होता.
मित्राने पैसे पाठवले. मात्र, ही रक्कम एका भारतीय व्यायसायिकाने पाठवले आहे, हे इंजीनिअरला माहिती नव्हते. ही रक्कम त्या व्यावसायिकाने व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्याला देण्याचे सांगितले. व्यावसायिक 10 हजार दिरहाम पाठवणार होता. त्याचा पहिला हप्ता 2100 दिरहाम होता.
advertisement
जेव्हा व्यावसायिकाचा कर्मचारी पैसे घ्यायला आला, तेव्हा व्यवहार अपूर्ण राहिला. याबाबत व्यावसायिकाने यूएई पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तर ही रक्कम थेट इंजीनिअरच्या खात्यात जमा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. यानंतर इंजीनिअरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी इंजीनिअरची चौकशी केली असता त्याने त्याच्या बँक खात्याची माहिती ही फक्त त्याच्या बालपणीच्या मित्राला दिली होती, असे त्याने सांगितले. तसेच त्याने स्वत:ला तो निर्दोष असल्याचे सांगितले. त्याला व्यवहार किंवा कायदेशीर अडचण याची माहिती नव्हती. इंजीनिअर आणि तक्रारदार हे मित्र होते आणि इंजीनिअरचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, असा युक्तिवाद त्याचे वकील हानी हममुदा हगाग यांनी न्यायालयात केला.
advertisement
वकिलाने कोर्टात असेही सांगितले की, “तक्रारदार आणि माझा क्लायंट मित्र आहेत. त्यांच्यात हे प्रकरण मिटले आहे. तसेच तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली असून लेखी माफीही दिली आहे. त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी.” मात्र, आरोपीला हद्दपार करण्यासह कठोर शिक्षेची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. दोन्ही बाजूंनी न्यायालयात दाद मागितली आहे. यूएईमध्ये आर्थिक गुन्ह्यांना कठोरपणे हाताळले जाते, हे या प्रकरणातूनही दिसून आले आहे.
Location :
International
First Published :
November 28, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पैशांसाठी बालपणीच्या मित्राने केली फसवणूक, भारतीय इंजीनिअरला अडकवले, नेमकं काय घडलं?