Crime News : मित्रासोबत फिरताना पाहिल्याचा राग आला, थेट तरूणाच्या पोटात 12 इंच खुपसलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका मैत्रिणीसोबत फिरताना पाहिल्याच्या रागातून एका तरूणाच्या चेहऱ्यावर वार केल्याची आणि पोटात तब्बल 12 इंच खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News : अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका मैत्रिणीसोबत फिरताना पाहिल्याच्या रागातून एका तरूणाच्या चेहऱ्यावर वार केल्याची आणि पोटात तब्बल 12 इंच खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सूरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत ऋत्विक कुलकर्णी हा छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात मैत्रिणीसोबत फिरत होता. याच रागातून मैत्रिणीच्या मित्रांने टवाळखोरांच्या ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी याच्या चेहऱ्यावर दोन, तर पोटात तब्बल 12 इंच खोल वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर ऋत्विकला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
advertisement
उस्मानपुऱ्यात महाविद्यालयीन युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच भागात पुन्हा एकदा तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
फ्लॅटमध्ये घुसून विद्यार्थ्याचा गळा चिरला
ऐन संक्रांतीच्या दिवशी मित्र बाहेर गेल्यानंतर मारेकरी घरात घुसले आणि विद्यार्थ्याची हत्या केली आहे. हत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे असं हत्या झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील भाजीवालीबाई परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ आणि इतर तीन मित्रही राहत होते.
advertisement
मंगळवारी सायंकाळी सर्व जण कॉलेजमधून घरी परतले होते. यानंतर सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते. यावेळी प्रदीप एकटाच फ्लॅटवर थांबला. पण रात्री 10 वाजता जेव्हा प्रदीपचा भाऊ आणि मित्र फ्लॅटवर परतले, तेव्हा प्रदीप गळा चिरलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडला होता.
कॉलेजमध्ये झालेल्या या वादानंतर प्रदीपची राहत्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रदीपची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र शनिवारी झालेल्या वादातूनच प्रदीपची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. विविध अँगलने पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत प्रदीप हा मुळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवाशी आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 17, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : मित्रासोबत फिरताना पाहिल्याचा राग आला, थेट तरूणाच्या पोटात 12 इंच खुपसलं


