मोठी बातमी! मतदानाच्या 12 तास अगोदर निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर, कसे असणार आहे टप्पे?

Last Updated:

निवडणूक आयोगाने 24 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आणि 154 सदस्यपदांसाठी 20 डिसेंबरला मतदान अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे.

News18
News18
मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. अशातच मतदानासाठी काही तास उरलेले असतानाच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने 24 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आणि 154 सदस्यपदांसाठी 20 डिसेंबरला मतदान अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या 24 अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या 154 सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबविली जाणार आहे. त्यासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. उर्वरित अन्य सर्व ठिकाणी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.
advertisement

स्थगित झालेल्या निवडणुकांचा कसा असणार आहे कार्यक्रम?

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.
advertisement

कधी होणार मतमोजणी?

अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप 11 डिसेंबर 2025 रोजी होईल. 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
advertisement

 नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे

  1. ठाणे- अंबरनाथ
  2. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी आणि नेवासा
  3. पुणे- बारामती आणि फुरसुंगी उरुळी देवाची
  4. सोलापूर- अनगर व मंगळवेढा
  5. सातारा- महाबळेश्वर आणि फलटण
  6. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री
  7. नांदेड- मुखेड आणि धर्माबाद
  8. लातूर- निलंगा आणि रेणापूर
  9. हिंगोली- बसमत
  10. अमरावती- अनंजनगा आणि सूर्जी
  11. अकोला- बाळापूर
  12. यवतमाळ- यवतमाळ
  13. वाशीम- वाशीम
  14. बुलढाणा- देऊळगावराजा
  15. वर्धा- देवळी
  16. चंद्रपूर- घुग्घूस

नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या जागांचा तपशील
अमरावती: अचलपूर-2, दर्यापूर-1, धारणी-2 व वरूड-1
advertisement
अहिल्यानगर: जामखेड-2, राहुरी-1, शिर्डी-1, शेवगाव-3, श्रीगोंदा-1, श्रीरामपूर-1 व संगमनेर-3
कोल्हापूर: गडहिंग्लज-1. गडचिरोली: आरमोरी-1 व गडचिरोली-3. गोंदिया: गोंदिया-3 व तिरोडा-1
चंद्रपूर: गडचांदूर-1, बल्लारपूर-1, मूल-1 व वरोरा-1. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर-2, पैठण-4 व वैजापूर-2
जळगाव: अंमळनेर-1, पाचोरा-2, भुसावळ-3, यावल-1, वरणगाव-2 व सावदा-3
जालना: भोकरदन-2. ठाणे: बदलापूर-6
धाराशिव: उमरगा-3 व धाराशिव-3
नांदेड: कुंडलवाडी-1, भोकर-1 व लोहा-1
advertisement
नागपूर: कामठी-3, कोंढाळी-2, नरखेड-3 व रामटेक-1
नाशिक: ओझर-2, चांदवड-1 व सिन्नर-4
परभणी: जिंतूर-1 व पुर्णा-2. पालघर: पालघर-1 व वाडा-1
पुणे: तळेगाव-6, दौंड-1, लोणावळा-2 व सासवड-1
बीड: अंबेजोगाई-4, किल्ले धारूर-1 व परळी-5
बुलढाणा: खामगाव-4, जळगाव जामोद-3 व शेगाव-2
भंडारा: भंडारा-2. यवतमाळ: दिग्रस-3, पांढरकवडा-2 व वणी-1
रत्नागिरी: रत्नागिरी-2
लातूर: उद्‌गीर-3
वर्धा: पुलगाव-2, वर्धा-2 व हिंगणघाट-3
advertisement
वाशीम: रिसोड-2
सांगली: शिराळा-1
सातारा: कराड-1 व मलकापूर-2
सोलापूर: पंढरपूर-2, बार्शी-1, मैंदर्गी-1, मोहोळ-2 व सांगोला-2
हिंगोली: हिंगोली-2.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! मतदानाच्या 12 तास अगोदर निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर, कसे असणार आहे टप्पे?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement