कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकाने कानशिलात लगावली, माजी आमदाराचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
- Published by:sachin Salve
Last Updated:
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
गोवा : गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा खून झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. एका ऑटो रिक्षावाल्यासोबत क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत मामलेदार यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात घटना घडली. ऑटो रिक्षा चालकाचे नाव मुजाहिद शकील जमादार (वय 28, सुभाषनगर बेळगाव) असं आहे. फोंडा गोवा येथील 68 वर्षीय माजी आमदार लवू मामलेदार हे काही कामानिमित्त आज शनिवारी बेळगावला आले होते. शहरातील येथील खडेबाजार परिसरातील श्रीनिवास लॉजजवळ दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कारमधून जात होते.  त्यावेळी गर्दीत त्यांची कार एका ऑटोरिक्षाला चाटून गेली.
advertisement
ही रिक्षा मुजाहिद शकील जमादारची होती. रिक्षाचालकाने मामलेदार यांना अडवलं आणि वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रिक्षाचालकाने मामलेदार यांच्या कानशिलात लगावली. या घटनेत मामलेदार हे एका लॉजच्या रिसेप्शन काउंटरजवळच खाली कोसळले. स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. लॉजच्या मॅनेजरने तातडीने या घटनेची माहिती गोवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
दरम्यान, ऑटो रिक्षा चालकाने मारहाण केली त्यावेळी मामलेदार घटनास्थळीच कोसळले होते, त्यामुळे मारहाणीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर ऑटोरिक्षा चालक मुजाहिद फरार झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गोव्याच्या माजी आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
advertisement
कोण होते लवू मामलेदार?
view commentsमयत लवू ममलेदार हे 2012 ते 2017 या कालावधीत फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. लवू मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, तथापी डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.
Location :
Goa
First Published :
February 15, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकाने कानशिलात लगावली, माजी आमदाराचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ


