दोघं जिवलग मित्र होते; त्या दिवशी सोबतच एका लग्नात गेले, पण एक चूक अन् मित्रानेच घेतला तरुणाचा जीव
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या कारणामुळे मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे
गोंदिया (रवी सपाटे, प्रतिनिधी) : दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या कारणामुळे मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वॉर्ड येथे घडली. राहुल दिलीप बिसेन (22, रा. शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया) असं मृत तरुणाचं नाव आहे.
मागील अनेक दिवसांपासून मित्र म्हणून वावरणारे आरोपी प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (23, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया) आणि मृत राहुल दिलीप बिसेन (22) हे दोघेही छोटा गोंदिया येथील लग्न समारंभात गेले होते. दोघांनीही मद्यप्राशन केलं होतं. मित्र असले तरी त्या दोघांची काहीवेळा शाब्दिक चकमक उडायची. या लग्न समारंभातही त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात राहुल बिसेन याने आरोपी प्रतीक भोयर याला शिवीगाळ केली.
advertisement
लग्नात शिवीगाळ केली म्हणून रागात प्रतीकने थांब तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर तो लग्न मंडपाच्या बाहेर निघून गेला. त्याच्या नंतर काही वेळातच राहुल बिसेन हासुद्धा बाहेर गेला आणि पुन्हा त्या दोघांत पुन्हा खटका उडाला. परिणामी प्रतीक भोयर याने राहुल बिसेनच्या पोटावर, छातीवर आणि शरीरावर धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली. गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
May 25, 2024 7:56 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
दोघं जिवलग मित्र होते; त्या दिवशी सोबतच एका लग्नात गेले, पण एक चूक अन् मित्रानेच घेतला तरुणाचा जीव










