कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जीव तोडून केला बचाव पण नराधमाने... महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या एका चालकाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे.
नागपूर: नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका चालकाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं निर्जनस्थळी कार घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
साहिल मनोहर चंदेल असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो चालक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मोठ्या भावाचं लग्न झालं. या लग्नात आरोपीची पीडितेशी ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपीनं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
घटनेच्या दिवशी आरोपी १५ वर्षीय पीडितेला भेटायला आला होता. त्याने गोड बोलून तिला कारमध्ये बसवलं. यानंतर तो मुलीला घेऊन बेलतरोडी परिसरात निर्जनस्थळी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं संधीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेनं अत्याचाराचा विरोध केला असता ती जखमी झाली. तरीही आरोपीनं अमानुषपणे तिच्यावर अत्याचार केला.
advertisement
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलगी घरी आली अन् तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीसोबत अत्याचार झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पोक्सो कलमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपी साहिल चंदेल याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jul 01, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जीव तोडून केला बचाव पण नराधमाने... महाराष्ट्राला हादरवणारी घटना!









