Goa: वाद काहीच नव्हता पण त्याने बापाच्या वयाच्या माजी आमदाराचा जीव घेतला, LIVE VIDEO

Last Updated:

रिक्षाचालकाने मामलेदार यांच्या कानशिलात लगावली. स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या घटनेनंतर मामलेदार हे शेजारीच असलेल्या लॉजमध्ये गेले. पण

(गोव्यातील घटना)
(गोव्यातील घटना)
गोवा : रस्त्यावर या ना त्या कारणामुळे नेहमी वाद होत असतात. पण गोव्यामध्ये एका माजी आमदाराला क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादात जीव गमवावा लागला आहे. गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार  यांच्या कारचा धक्का लागला म्हणून एका ऑटो रिक्षावाल्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर ह्रदयविकाराच्या धक्क्याने मामलेदार यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात घटना घडली. ऑटो रिक्षा चालकाचे नाव मुजाहिद शकील जमादार (वय 28, सुभाषनगर बेळगाव) असं आहे. फोंडा गोवा येथील 68 वर्षीय माजी आमदार लवू मामलेदार हे काही कामानिमित्त आज शनिवारी बेळगावला आले होते. शहरातील येथील खडेबाजार परिसरातील श्रीनिवास लॉजजवळ दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कारमधून जात होते. त्यावेळी गर्दीत त्यांची कार एका ऑटोरिक्षाला चाटून गेली. ही रिक्षा मुजाहिद शकील जमादारची होती. रिक्षाचालकाने मामलेदार यांना अडवलं आणि वाद घालायला सुरुवात केली.
advertisement
हा वाद इतका विकोपाला गेला की, रिक्षाचालकाने मामलेदार यांच्या कानशिलात लगावली. स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या घटनेनंतर मामलेदार हे शेजारीच असलेल्या लॉजमध्ये गेले. पण रिसेप्शन काउंटरजवळ पोहोचले असता खाली कोसळले. लॉजच्या मॅनेजरने तातडीने या घटनेची माहिती गोवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
दरम्यान, ऑटो रिक्षा चालकाने मारहाण केली होती. मारहाणीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर ऑटोरिक्षा चालक मुजाहिद फरार झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गोव्याच्या माजी आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
advertisement
कोण होते लवू मामलेदार?
मयत लवू ममलेदार हे 2012 ते 2017 या कालावधीत फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. लवू मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, तथापी डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Goa: वाद काहीच नव्हता पण त्याने बापाच्या वयाच्या माजी आमदाराचा जीव घेतला, LIVE VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement