Crime News : पोट दुखतंय म्हणून मुलीला डॉक्टरांकडे नेलं; तपासणीत आजोबांचे घृणास्पद कृत्य उघड

Last Updated:

Crime News : आजोबा आणि नाती यांच्या नात्याला काळामी फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.

News18
News18
imeहापूर : देशात महिला आणि मुलींच्या लैंगिक छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. कोलकाता आणि महाराष्ट्रातल्या बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच उत्तर प्रदेशातदेखील अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या हापूर इथे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलीवर नात्याने आजोबा असलेल्या व्यक्तीने बलात्कार केला आहे. त्या व्यक्तीने वर्षभर पीडित मुलीवर बलात्कार केला. यामुळे ती गरोदर राहिली. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने चुलतीने तिला दवाखान्यात नेलं. तपासणी केली असता मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं.
13 वर्षांपूर्वी हापूर जिल्ह्यातल्या एका गावात मुलीला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांची तिचा सांभाळ केला. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडिलांच्या एका नातेवाईकाने मुलीला सोबत नेलं. हा नातेवाईक नात्याने तिचा आजोबा लागत होता. काही दिवसांनी या नातेवाईकाच्या पत्नीचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात दुखू लागल्यावर आजोबाने तिला तिच्या चुलत्याच्या घरी सोडलं. चुलती मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली तेव्हा ती गरोदर असल्याचं दिसून आलं. मुलीच्या चुलतीने महिनाभरापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. बालकल्याण समितीकडून मिळालेल्या पत्रानुसार, डॉक्टरांच्या एका पॅनेलने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. ती सात महिन्यांची गरोदर असल्याने प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्याने डॉक्टरांच्या पॅनेलने गर्भपात करण्यास नकार दिला आहे. बालकल्याण समितीने या प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात पाठवला आहे.
advertisement
बालकल्याण समितीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण हायकोर्टात गेलं आहे. तिथून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर मुलीच्या पोटातल्या बाळाबाबत निर्णय घेतला जाईल. मुलीला आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पत्र पाठवण्यात आलं आहे.
वाचा - असे कसे आई-बाप? लेकराला जमिनीत पुरलं; 15 दिवसांनी बाहेर काढलं, सिंधुदुर्ग हादरलं
बालकल्याण समितीचे अध्यक्ष अभिषेक त्यागी यांनी सांगितलं, की 13 वर्षांच्या मुलीचा आजोबा तिच्यावर एक वर्षापासून बलात्कार करत होता. पीडितेने याबाबत जबाब दिला आहे. बहादूरगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद यांनी सांगितलं, की हायकोर्टाने अद्याप सात महिन्यांच्या गर्भाबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. आजोबाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : पोट दुखतंय म्हणून मुलीला डॉक्टरांकडे नेलं; तपासणीत आजोबांचे घृणास्पद कृत्य उघड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement