Crime News: शहापूरमध्ये मध्यरात्रीच हत्येचा थरार; सासरच्यांनी विवाहितेला गोळ्या झाडून संपवलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या घटनेत विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सुनिल घरात, भिवंडी 21 सप्टेंबर : राज्यात रोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अशात आता ठाण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सासरच्या लोकांनी एका विवाहित महिलेची हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेत विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथे ही घटना घडली. यात रंजना शिवा भवर नावाच्या महिलेची सासरच्या मंडळींनी हत्या केली.
advertisement
मृत महिलेचं वय 27 वर्षे होतं. सासरकडील लोकांनी रंजना हिची रात्री 12 वाजेच्या सुमारास हत्या केली आहे. सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून तिचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच मृत महिला रंजना भवर हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी महिलेला खर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे नेलं असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement
शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. आता महिलेचा मृतदेह मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात सासरच्या 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात हत्यचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डी आणि शहापूर पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2023 7:26 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: शहापूरमध्ये मध्यरात्रीच हत्येचा थरार; सासरच्यांनी विवाहितेला गोळ्या झाडून संपवलं


